शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

Satara: मलकापुरात उड्डाणपुलावरील सिगमेंट लाँचर उतरवण्यास सुरुवात, शिवछावा चौकात भली मोठी क्रेन

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 10, 2025 18:53 IST

अचानक वाहतुकीत बदल केल्यामुळे वाहनधारकांमध्ये संभ्रम

मलकापूर : पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर कऱ्हाड तालुक्यातील मलकापूर हद्दीत उड्डाणपुलासाठी वापरलेले सिगमेंट लाँचर मशीन उतरवण्यास सुरुवात केली आहे. त्यासाठी मंगळवारी शिवछावा चौकात भली मोठी क्रेन लाँच केली आहे. यामुळे वाहतुकीत बदल करण्यात आला. अचानक वाहतुकीत बदल केल्यामुळे वाहनधारकांमध्ये संभ्रम निर्माण होऊन काहीकाळ वाहतूक कोंडी झाली हाती. येथील युनिक उड्डाणपुलाचे सिगमेंट बसवण्याचे काम पूर्ण झाले आहे. या कामासाठी वापरलेले सिगमेंट लॉन्चर मशीन उतरवण्याचे काही दिवसांपासून प्रयत्न सुरू आहेत. हे मशीन उतरवण्याचे काम पंधरा दिवस चालणार आहे. यासाठी शिवछावा चौकातील जागा निश्चित केली आहे. हा परिसर अतिशय वर्दळीचा असल्याने प्रशासनाकडून दोनवेळा चाचणीचा निर्णय घेण्यात आला होता. लाँचर उतरवण्याचे काम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी नियोजनबद्ध पावले उचलली जात आहेत. त्यानुसार काही दिवसांपूर्वी शिवछावा चौकात पोलिस उपअधीक्षक राजश्री पाटील, प्रांताधिकारी अतुल म्हेत्रे, अदानीचे मुकेश, डी. पी. जैनचे नागेश्वर राव, राजीव बक्षी, सहायक पोलिस निरीक्षक अमित बाबर, वाहतूक शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक संदीप सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली वाहतूक बदलाची चाचणी घेण्यात आली होती.गणेश उत्सवामुळे मशीन उतरवणे थांबवले होते. गणपती गेल्यावर सोमवारी रात्रीच भली मोठी क्रेन चौकात आणली आहे. त्यासाठी मंगळवारी शिवछावा चौकात वाहतुकीत बदल करण्यात आला. दिवसभर क्रेन बसवणे व वाहतूक चाचणी करून रात्री लॉन्चर मशीन उतरवण्यास सुरुवात होणार आहे. 

शिवछावा चौकात छेदरस्त्यासह एक मार्ग बंदशिवछावा चौकात एक मार्ग बंद करून ढेबेवाडीकडे जाणारी व येणारी वाहतूक दुभाजक लावून एकाच बाजूने सुरू केली आहे, तर चौकातील छेदरस्ता बंद केला आहे. त्यासाठी चौकाच्या दोन्ही बाजूला काही अंतरावर यु-टर्न तयार केले आहेत. महामार्गावरील वाहतूक स्लिप रोडवरून वळवली आहे.