दुभाजकातील रोपे पाण्याअभावी होरपळली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 05:14 IST2021-02-06T05:14:34+5:302021-02-06T05:14:34+5:30
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मालकीचा असलेला हा रस्ता माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या कार्यकाळात चौपदरी करण्यात आला. दुभाजकात वृक्षारोपण केल्याने ...

दुभाजकातील रोपे पाण्याअभावी होरपळली
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मालकीचा असलेला हा रस्ता माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या कार्यकाळात चौपदरी करण्यात आला. दुभाजकात वृक्षारोपण केल्याने हा रस्ता खूपच आकर्षक दिसतो. रात्री समोरून येणाऱ्या वाहनाचा प्रकाश या वृक्षांमुळे तोंडावर येत नाही आणि वाहन चालवणे सुकर होत असते. पावसाळ्यात या झाडांना बहर येतो. रस्त्याचे सौंदर्य खुलून दिसते. मात्र, या रोपांची निगा राखण्यासाठी प्रयत्न केले जात नाहीत.
पावसाळा संपून तीन महिन्यांचा कालावधी लोटला आहे; मात्र, या तीन महिन्यांत या वृक्षांना कोणीही पाणी पुरवठा केला नाही. सार्वजनिक बांधकाम विभागाने किंवा ग्रामपंचायतीने सामाजिक बांधिलकी म्हणून या झाडांना पाणी देण्याची तसदी घेतली नाही. त्यामुळे सध्या ही रोपे सुकून जाऊ लागली आहेत. लवकरच पाणी न दिल्यास काही दिवसात यातील काही रोपे जळून जातील, अशी भीती निर्माण झाली आहे.
- चौकट
मलकापूरसारखी निगा राखली जावी!
मलकापूर येथे ढेबेवाडी रस्त्याच्या दुभाजकात लावलेल्या रोपांना नियमित पाणी दिले जाते. त्यामुळे या भागातील वृक्ष नेहमीच टवटवीत दिसतात. त्यांची योग्य काळजी घेतली जात असल्याने वेगाने वाढ होत आहे. अशीच निगा राखत व उन्हाळ्यात नियमित पाणी देण्याची सोय करण्याची मागणी विद्यानगरवासीय करीत आहेत.
फोटो : ०५केआरडी०१
कॅप्शन : विद्यानगर येथे रस्त्याच्या दुभाजकातील रोपे पाण्याअभावी होरपळून गेली आहेत. (छाया : संदीप कोरडे)