कोरोनाची दुसरी लाट ओसरतेय!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2021 04:45 IST2021-09-04T04:45:31+5:302021-09-04T04:45:31+5:30
कऱ्हाड तालुक्यात पहिल्या लाटेपेक्षा दुसऱ्या लाटेत कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत गेली. पहिल्या लाटेत गावागावांत फारसा संसर्ग झाला नव्हता. ...

कोरोनाची दुसरी लाट ओसरतेय!
कऱ्हाड तालुक्यात पहिल्या लाटेपेक्षा दुसऱ्या लाटेत कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत गेली. पहिल्या लाटेत गावागावांत फारसा संसर्ग झाला नव्हता. मात्र, दुसऱ्या लाटेत कोरोनाचा संसर्ग वाढला. रुग्णांच्या मृत्यू संख्येत वाढ झाली. एप्रिल, मे, जून व जुलै या चार महिन्यांत सर्वाधिक रुग्णसंख्या होती. त्यामुळे कृष्णाकाठावरील सर्व गावांमध्ये वेगाने संसर्ग झाला. आरोग्य विभागाने गावनिहाय चाचणीवर भर दिला असल्यामुळे गावोगावी रुग्णसंख्या कमी झाल्याचे दिसून येत आहे. तसेच आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांमुळे कोरोना रुग्णांची त्या काळामध्ये घेतलेली काळजी व योग्य उपचार यामुळे दुसऱ्या लाटेतून सावरण्यासाठी आरोग्य विभागाचे मोलाचे योगदान आहे.
कृष्णाकाठावरील गावांमध्ये एप्रिल २०२१ ते २३ ऑगस्ट २०२१ पर्यंत २ हजार ५२० रुग्ण आढळले आहेत. त्यापैकी २ हजार ३४८ रुग्ण बरे झाले आहेत. आतापर्यंत कोरोनामुळे ११४ जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या ६७ रुग्ण उपचारात आहेत. गत महिन्यात विभागातील अकरा गावांमध्ये रुग्णसंख्या ४२६ होती. मात्र, सध्या अकरा गावांपैकी तीन गावे कोरोनामुक्त असून, आठ गावांमध्येही रुग्णसंख्या कमी आहे.
- चौकट
गावनिहाय सक्रिय रुग्ण
वडगाव हवेली : १३
कार्वे : ११
शेरे : ११
दुशेरे : ४
कोडोली : ०
गोळेश्वर : ८
कापिल : ८
कोरेगाव : ९
शेणोली : ३
संजयनगर : ०
गोंदी : ०
- चौकट
रुग्णसंख्या कमी होऊ लागली..!
विभागातील दोन गावांमध्ये दहापेक्षा अधिक रुग्णसंख्या आहे, तर तीन गावांत सध्या एकही रुग्ण सक्रिय नाही. ११ गावांमध्ये दहापेक्षा कमी सक्रिय रुग्ण आहेत. कृष्णाकाठावरील गावांमध्ये कोरोना रुग्णसंख्या हळूहळू कमी होऊ लागली आहे.
- कोट
सध्या वडगाव हवेली प्राथमिक आरोग्य केंद्राकडे मोठ्या प्रमाणात लस उपलब्ध असून, गावोगावी लसीकरण करण्यासाठी भर दिला जात आहे. लसीकरणामुळे कोरोना आटोक्यात येण्यास मदत होणार आहे. या लसीकरणासाठी ग्रामदक्षता कमिटीने सहकार्य करावे.
- डॉ. इंदिरा भिंगारदेवे, वैद्यकीय अधिकारी, वडगाव हवेली
.............................................................