शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

उसाचा दुसरा हप्ता: २ ऑक्टोबरपर्यंत पैसे खात्यावर जमा न केल्यास..; ‘स्वाभिमानी’चा इशारा

By नितीन काळेल | Updated: September 27, 2023 19:26 IST

सातारा : दसरा-दिवाळीचा सण जवळ आला आहे. त्यामुळे साखर कारखान्यांनी गेल्यावर्षी तुटलेल्या उसाला दुसरा हप्ता प्रतिटन ४०० रुपये द्यावा ...

सातारा : दसरा-दिवाळीचा सण जवळ आला आहे. त्यामुळे साखर कारखान्यांनी गेल्यावर्षी तुटलेल्या उसाला दुसरा हप्ता प्रतिटन ४०० रुपये द्यावा या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने कारखान्यांना निवेदन देण्यात आले. तसेच २ आंक्टोबरपर्यंत पैसे खात्यावर जमा न केल्यास कारखान्याची साखर अडवूण आंदोलन करण्याचाही इशारा देण्यात आला आहे. याबाबत देण्यात आलेली माहिती अशी की, १३ सप्टेंबर रोजी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली कोल्हापूरला साखर सहसंचालक कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चामध्ये साखर सहसंचालकांकडे हजारो शेतकऱ्यांच्या वतीने गेल्यावर्षी तुटलेल्या उसाला दुसरा हप्ता प्रतिटन ४०० रूपये देण्याची मागणी करण्यात आली आहे. तर गेल्या वर्षभरात साखरेला व उपपदार्थास राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय बाजारात चांगले दर मिळाले आहेत. साखर कारखान्यांना यामधून चांगल्या पध्दतीने नफा मिळालेला आहे. सध्याच्या वाढलेल्या महागाईमुळे औषधे, खते, बीबियाणे, किटकनाशकाच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. या महागाईमुळे शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहेत. आता तोंडावर दसरा आणि दिवाळी सण आला आहे. त्यामुळे उस उत्पादक शेतकऱ्यांकडे सणासुदीला पैसे नाहीत. यामुळे कारखान्यांनी तातडीने दुसरा हप्ता ४०० रूपये शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करावा. तसेच २०२१- २२ मधील जाहीर केलेल्या दरात कपात केली, तेही पृसे शेतकऱ्यांना द्यावेत. तर दुसरा हप्ता २ ऑक्टोंबरपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा न केल्यास कारखान्याची साखर अडवून आंदोलन करण्यात येणार आहे, असा इशारा देण्यात आला आहे.याबाबत स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने जिल्ह्यातील साखर कारखान्यांना निवेदन देण्यात आले आहे. जिल्हाध्यक्ष राजू शेळके, राज्य कार्यकारिणी सदस्य अर्जुनभाऊ सांळुखे, वाहतूक संघटनेचे अध्यक्ष मनोहर येवले, सातारा तालुकाध्यक्ष रमेश पिसाळ, उपाध्यक्ष संजय जाधव, कोरेगाव तालुकाध्यक्ष जीवन शिर्के, राजू घाडगे, मोहन घाडगे, बाळासाहेब गोळे, विठ्ठल पवार, जोतिराम झांजुर्णे, महादेव डोंगरे, महेंद्र सांळुखे,जनार्दन आवारे आदी उपस्थित होते.

रॅली काढून या कारखान्यांना निवेदन...स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने बुधवारी पहिल्या टप्प्यामध्ये रॅलीने पहिल्यांदा शेंद्रेतील अजिंक्यतारा सहकारी साखर कारखाना, भुइंजच्या किसन वीर सहकारी साखर कारखाना, कोरेगाव तालुक्यातील चिमणगावच्या जरंडेश्वर शुगर कारखान्यांना निवेदन देण्यात आले आहे. अशाचप्रकारे इतर साखार कारखान्यांनाही निवेदन देण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरSugar factoryसाखर कारखानेSwabimani Shetkari Sanghatnaस्वाभिमानी शेतकरी संघटना