कोविशिल्ड लसीचा दुसरा डोस ८४ दिवसानंतरच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2021 04:39 IST2021-05-23T04:39:04+5:302021-05-23T04:39:04+5:30
सातारा : केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार ज्या नागरिकांनी पूर्वी कोविशिल्ड या लसीचा पहिला डोस घेतला आहे, त्यांना दि. ...

कोविशिल्ड लसीचा दुसरा डोस ८४ दिवसानंतरच
सातारा : केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार ज्या नागरिकांनी पूर्वी कोविशिल्ड या लसीचा पहिला डोस घेतला आहे, त्यांना दि. १५ मेपासून कोविशिल्ड या लसीचा दुसरा डोस हा १२ ते १६ आठवड्याच्या दरम्यान देण्यात येणार आहे. याबाबतचा बदल कोविन ॲपमध्ये दि. १४ मेच्या मध्यरात्रीपासून करण्यात येणार आहे, असे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये यांनी सांगितले.
कोव्हॅक्सिनच्या पहिल्या,दुसऱ्या डोसच्या अंतरामध्ये कोणत्याही प्रकारचा बदल करण्यात आला नसून, त्याचे लसीकरण पूर्वीप्रमाणेच सुरू राहणार आहे. सातारा जिल्ह्यातील नागरिकांनी ज्यांचा कोविशिल्ड या लसीचा पहिला डोस घेऊन ८४ दिवस पूर्ण झाले आहेत त्यांनी पुढील दुसरा डोस घेण्याकरिता लसीकरण केंद्रावर जावे. परंतु ज्यांचे ८४ दिवस पूर्ण झालेले नाहीत त्यांनी लसीकरण केंद्रावर अनावश्यक गर्दी करू नये, असे आवाहनही जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये यांनी केले आहे.