सातबारा संगणकात; शेतकरी बुचकळ्यात!

By Admin | Updated: November 26, 2015 00:01 IST2015-11-26T00:01:58+5:302015-11-26T00:01:58+5:30

महसूल विभागाचे काम ठप्प : लिखित सातबारा बंदीमुळे शेतकऱ्यांचे हाल

In Sebbara computer; Farmer is a bunch! | सातबारा संगणकात; शेतकरी बुचकळ्यात!

सातबारा संगणकात; शेतकरी बुचकळ्यात!

पांडुरंग भिलारे ल्ल वाई
वाई तहसीलदारांनी महसूल विभागाच्या लेखी सातबारा उतारे न स्वीकारण्याचा आदेश सर्व मंडलाधिकाऱ्यांना देण्यात आलेल्या आदेशामुळे लेखी महसूल विभागातर्फे लेखी उतारे स्वीकारले जात नाहीत़ सर्व रेकॉर्ड आॅनलाईन करण्याचे कामकाज सुरू आहे़ यामुळे शेतकऱ्यांचे व खरेदीविक्रीचे व्यवहार करणाऱ्यांना मोठा मन:स्ताप होऊन व्यवहार ठप्प झाल्याने मोठ्या नुकसानीस सामोरे जावे जागत आहे़ तसेच या निर्णयामुळे शासनाचा लाखोंचा महसूल बुडत असून, याला जबाबदार कोण? हा मोठा प्रश्न आहे़
दरम्यान, तहसीलदारांच्या सहीनिशी काढण्यात आलेल्या पत्रामध्ये अशा प्रकारे तलाठ्यांना आदेश देण्यात आले आहेत़ जमाबंदी आयुक्त आणि संचालक भूमी अभिलेख, पुणे यांच्याकडील संदर्भीय आदेशान्वये वाई तालुक्यात आॅनलाईन ई-अज्ञावलीची अंमलबजावणी दि़ २३ आॅक्टोबर १५ पासून करण्याची आहे. यास्तव दि़ २३ आॅक्टोबर १५ पासून हस्तलिखित साताबारा फेरफार नोंदवही व ८ अ नोंदवहीमधील हस्तलिखित कामकाज बंद करण्याचे आहे, तरी आपल्या मंडलातील सर्व सजांतील सर्व तलाठी यांच्याकडील हस्तलिखित सातबारा फेरफार व ७ अ नोंंद वही रितसर या कार्यालयात जमा करण्याच्या आहेत. तसेच हस्तलिखित सातबारा फेरफार नोंदवही व ८ अ नोंदवही याचे हस्तलिखित वितरण दि़ २३ आॅक्टोबर १५ पासून पूर्णपणे बंद करण्याचे असल्याने दि़ २२ आॅक्टोबर १५ रोजी सायंकाळी सर्व कामगार तलाठी यांच्याकडील वर नमूद केलेले सातबारा फेरफार नोंदवही व ८ अ नोंदवही या कार्यालयामध्ये बिनचूक जमा करण्याची दक्षता घ्यावी, अशा प्रकारे आदेश काढण्यात आले आहेत़ मुळात सातबारा व ८ अ रेकॉर्डचे संगणकीकरण हे सदोष झाल्याने आॅनलाईन अनेक उतारे दिसत नाही़ बरेच रेकॉर्ड अपूर्ण आहे़ त्यामुळे तलाठ्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे़ मात्र निर्णयामुळे शेतकऱ्यांची ससेहोलपट होताना दिसत आहे़ आणि आॅनलाईन सातबारा, ८ अ मधील त्रुटी आणखी किती दिवस दूर होतील, हे सांगता येत नाही़ वास्तविक पाहता आॅनलाईन रेकॉर्ड अद्ययावत करून तलाठ्यांना त्याचे प्रशिक्षण देण्यात यावे व नोंदणीविषयी स्पष्टता असावी, असे मत शेतकऱ्यांनी व्यक्त केले़
शासनाचे मोठे आर्थिक नुकसान...
वाई महसूल विभागात दररोज १५ ते २० व्यवहार होत असतात यापासून ७९ ते ८० हजारांचा महसूल स्टॅम्प ड्यूटीच्या माध्यमातून शासनाला मिळत असतो़ तो महसूल बुडत असल्याने शासनाचे मोठे नुकसान होत आहे़

आॅनलाईन रेकॉर्डमध्ये काही त्रुटी आहेत, येत्या आठ दिवसांत त्या दूर करून आॅनलाईन उतारे देण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत़ तलाठ्यांना आॅनलाईनचे प्रशिक्षण चालू केले आहे़
- सदाशिव पडदुणे, तहसीलदार वाई
आॅनलाईनची सुविधा न करताच लेखी उतारे बंद केल्याने शेतकऱ्यांना मोठा मन:स्ताप होत आहे़ तसेच कामांचा खोळंबा होत आहे तरी शासनाने यावर त्वरित तोडगा काढून यंत्रणा सुरळीत करावी़
- राघू बापू सणस, शेतकरी
शेकडो व्यवहार झाले ठप्प
वाई महसूल क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर जागांचे खरेदी विक्रीचे व्यवहार सुरू असतात. अनेकांनी साठेखत करून तर कोणी ‘टोकन’ देवून जागा खरेदीच्या व्यवहाराला सुरूवात केली आहे, पण सातबारा मिळत नसल्याने हे सर्वच व्यवहार ठप्प झाले आहेत.

Web Title: In Sebbara computer; Farmer is a bunch!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.