स्कोलीनचा डोस जीवघेणा...

By Admin | Updated: August 20, 2016 22:51 IST2016-08-20T22:39:10+5:302016-08-20T22:51:12+5:30

वैद्यक शास्त्रात रोज नवनवे शोध लागत आहेत. तसेच औषधोपचारही मिळू लागले आहेत.

Scoline dosage is fatal ... | स्कोलीनचा डोस जीवघेणा...

स्कोलीनचा डोस जीवघेणा...

नितीन काळेल -- सातारा --चांगल्या गोष्टी, चांगल्या सवयींमुळे नेहमी चांगलेच होते. तसेच चांगल्या औषधांमुळे रुग्ण बराही होत असतो; मात्र एखाद्या चांगल्या औषधाचा चुकीचा वापर केला तर एखाद्याचा बळीही जातो. अशीच घटना वाईतील खुनाच्या प्रकारामुळे सध्या समोर आली आहे. शस्त्रक्रियेमध्ये महत्त्वाचे ठरणारे ‘स्कोलिन’ हेच ते औषध आहे. या औषधामुळे नैसर्गिक श्वासोच्छवासच बंद होतो. हेच औषध संतोष पोळ याने मारण्यासाठी वापरले असल्याचे पुढे आले आहे.
वैद्यक शास्त्रात रोज नवनवे शोध लागत आहेत. तसेच औषधोपचारही मिळू लागले आहेत. पूर्वी शहरात मिळणाऱ्या सुविधा आज निमशहरी, काही मोठ्या खेड्यातील सुसज्ज रुग्णालयांमध्येही मिळू लागल्या आहेत. त्यामुळे मानवाचे जीवन सुसह्य होऊ लागले आहे. एकीकडे असे चित्र असले तरी औषधांचा चुकीचाही वापर होत असल्याचे समोर येत आहे. संजीवनी ठरलेल्या औषधाचा गैरवापर केल्यास जीवही जाऊ शकतो. संतोष पोळ याने केलेल्या खुनाच्या प्रकारामुळे औषधाचा कसा चुकीचा वापर होतो, ते समोर आले आहे.
‘सक्सिनल स्कोलिन’ हे औषध मोठ्या रुग्णालयात, आयसीयूमध्ये वापरण्यात येते. या औषधाचा वापर हा शस्त्रक्रियेवेळी होतो. मोठ्या शस्त्रक्रिया असतील तर हे औषध खूप महत्त्वाचे ठरते. कारण, या औषधामुळे नैसर्गिक श्वास घेण्याची क्रिया बंद होतानाच शरीरातील स्नायू शिथिल होतात. याच औषधाचा चुकीचा वापर होऊ लागला आहे. हे औषध एखाद्याला मारण्यासाठी खूप सोपे ठरू लागले आहे. या औषधाचा डोस दिला तर त्या व्यक्तीचा नैसर्गिक श्वासोच्छवास बंद होतो. त्यामुळे संबंधित व्यक्तीचा मृत्यू होतो. सलाईनद्वारे हे औषध दिले तर लगेच त्याचा परिणाम होतो. तर स्नायूद्वारे द्यायचे झ
ाले तर हळूहळू परिणाम
होत असतो; पण या औषधाच्या चुकीच्या वापराने मृत्यू निश्चित असतो.

तरबेज लोकांकडूनच
योग्य वापर...
भूलतज्ज्ञ, रुग्णालयाच्या आयसीयूमधील कर्मचारी तसेच कृत्रिम श्वासोच्छवास देण्यास तरबेज असणारे असे मोजके लोकच या औषधाचा वापर योग्य करू शकतात. अन्यथा अभ्यास नाही अशा डॉक्टरांनाही याचा वापर करणे अशक्य आहे. हे औषध डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय बाहेर कोठेही मिळू शकत नाही.


मोठ्या शस्त्रक्रिये वेळी ‘सक्सिनल स्कोलिन’ हे औषध महत्त्वाचे ठरते. या औषधाने उत्क्रांती आणली आहे. पण, त्याचा चुकीचा वापर होतो, ते टाळणे महत्त्वाचे आहे. संबंधित तज्ज्ञ डॉक्टरांशिवाय त्याचा वापर कोणीही करू नये.
- डॉ. अविनाश भोसले, सातारा

Web Title: Scoline dosage is fatal ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.