शाळा भरल्या अन् एस. टी.ची चाकं खेड्यांकडे धावली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 05:13 IST2021-02-06T05:13:30+5:302021-02-06T05:13:30+5:30
सातारा : कोरोनाचा संसर्ग कमी होत असल्याचे लक्षात आल्यानंतर राज्य शासनाने पाचवी ते आठवीपर्यंतच्या शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला. ...

शाळा भरल्या अन् एस. टी.ची चाकं खेड्यांकडे धावली
सातारा : कोरोनाचा संसर्ग कमी होत असल्याचे लक्षात आल्यानंतर राज्य शासनाने पाचवी ते आठवीपर्यंतच्या शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयानंतर राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या सातारा विभागाने एस. टी.च्या फेऱ्या ग्रामीण भागात वाढविल्या आहेत. यामुळे अनेक भागात कित्येक दिवसांनंतर एस. टी.ची चाके धावली आहेत. त्याचप्रमाणे मागणीनुसार फेऱ्या वाढविण्याबाबत आगार व्यवस्थापनाला सूचना केल्या आहेत.
सातारा जिल्ह्यात मार्च २०२०मध्ये कोरोनाचा शिरकाव झाला. त्यानंतर राज्य शासनाने कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सर्वच शाळा, महाविद्यालये बंद ठेवण्याच्या सूचना केल्या होत्या. पर्यायाने मुले घरातच बसून ऑनलाईन पद्धतीने शिक्षण घेत होती.
दरम्यान, एस. टी.ची चाके थांबली होती. ती सुरू करण्यात आली. मात्र, शाळा, महाविद्यालये बंद असल्याने उत्पन्न वाढविण्यासाठी अनेक आगारांमधून लांब पल्ल्याच्या जादा गाड्या सुरू करण्यात आल्या होत्या. आता शाळा सुरू झाल्या आहेत. राज्य शासनाने २७ जानेवारीपासून शाळा सुरू करण्याच्या सूचना केल्या. मात्र, खासगी इंग्लिश मीडियमच्या बहुतांश शाळा १ फेब्रुवारीपासून सुरू झाल्या आहेत. विद्यार्थ्यांची गैरसोय टाळण्यासाठी एस. टी. महामंडळाने शहरी भागातून ग्रामीण फेऱ्या वाढविल्या आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांची सोय होत आहे. मात्र, असंख्य पालकांनी अद्याप संमत्ती पत्र दिलेले नसल्याने गाड्यांना फारशी गर्दी दिसत नाही.
चौकट
००००
जिल्ह्यात सुरू झालेल्या शाळांची संख्या
२३७४
विद्यार्थी संख्या
७२८४७
पाचवी ते आठवी
००००
नववी ते बारावी
------------
पास योजनेचा लाभ घ्यावा
राज्य शासनाच्या सूचनेनुसार जिल्ह्यात पाचवी ते बारावी वर्ग सुरू झाले आहेत. त्याची दखल घेऊन एस. टी. महामंडळानेही गाड्यांच्या फेऱ्या वाढविल्या आहेत. मागणीनुसार आणखी गाड्या सोडण्यात येणार आहेत. याबाबत सूचना केल्या आहेत. मात्र, अनेक विद्यार्थ्यांनी विद्यार्थी पासचा वापर केलेला नाही. ही संख्याही वाढणे गरजेचे आहे.
- ज्योती गायकवाड,
विभागीय वाहतूक अधिकारी, सातारा.
००००००००
सातारारोडला साताऱ्यातून पहाटे गाडी सोडण्याची गरज
अनेक शिक्षक साताऱ्यातून ग्रामीण भागात शाळेत शिकवण्यासाठी जातात. त्यांना आता लवकरच नोकरीच्या ठिकाणी जावे लागते. त्याचप्रमाणे दुर्गम भागातील शिक्षकांनाही गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. सातारा मध्यवर्ती बसस्थानकातून सातारारोड त्याचप्रमाणे इतर भागात गाड्यांची फेरी सुरू करावी, अशी मागणी ग्रामीण भागातून केली जात आहे.
०००००००
चौकट
विद्यार्थी म्हणतात...!
आम्हाला शाळेला कधी जाऊ असे झाले होते. आता एस. टी.ही सुरू झाली आहे. त्यामुळे चांगलीच सोय होणार आहे. पण शाळा पूर्ण वेळ भरत नाही. ती लवकर सुटत असल्याने गावी जाताना बराच वेळ वाट पाहावी लागते.
- अर्थव पाटील, फलटण.
----
शाळा सुरू झाल्यामुळे एस. टी.ही सुरू झाली. मी एस. टी.नेच शाळेला जातो. पण आमच्या अनेक मित्रांचे आई-वडील त्यांना एस. टी.ने पाठवत नाहीत. त्यांना कोरोनामुळे संसर्ग वाढण्याची भीती वाढत असावी.
- सागर गडकरी
विद्यार्थी, मेढा.
०००००००००
कोरोनाआधी २३०० फेऱ्या होत्या धावत
कोरोनाचा शिरकाव होण्यापूर्वी जिल्ह्यातील प्रत्येक भागात अगदी दुर्गम पाटण, महाबळेश्वर, जावळी खोऱ्यातही एस. टी. पोहोचली होती. त्या काळात दररोज सरासरी २३०० फेऱ्या होत होत्या. आता मात्र कमालीची घट झाली आहे. सध्या सरासरी अठराशे फेऱ्या सुरू आहेत. मात्र, शाळा आता कोठे सुरू झाल्या आहेत. काही दिवसांनंतर चित्र नक्कीच बदललेले असले.
०४एसटी
०४स्टुडंट