शिष्यवृत्ती परीक्षा ८ ऑगस्टला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2021 04:23 IST2021-07-23T04:23:56+5:302021-07-23T04:23:56+5:30
कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण सातारा : समाज कल्याण विभागात प्रशासकीय गतिमानता व सुधारणा करण्यासाठी विविध संवर्गातील अधिकारी, कर्मचारी यांच्यासाठी राज्य शासनाच्या ...

शिष्यवृत्ती परीक्षा ८ ऑगस्टला
कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण
सातारा : समाज कल्याण विभागात प्रशासकीय गतिमानता व सुधारणा करण्यासाठी विविध संवर्गातील अधिकारी, कर्मचारी यांच्यासाठी राज्य शासनाच्या यशदा व बार्टीच्या माध्यमातून प्रशिक्षण कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. यासाठी समाजकल्याण आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे यांनी पुढाकार घेऊन प्रशिक्षण कार्यक्रमास सुरुवात होणार आहे.
जकातवाडीत सत्कार
सातारा : जकातवाडी, ता. सातारा येथील ग्रामपंचायतीतर्फे कोविडकाळात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा गौरव करण्यात आला. पंचायत समिती सभापती सरिता इंदलकर, उपसभापती अरविंद जाधव, सरपंच चंद्रकांत सणस यांची उपस्थिती होती. कार्यक्रमास मंगेश नलवडे, प्रा. निरंजन फडणीस, उत्तम भोसले, डॉ. ज्योती जावळे, डॉ. आशिष शेलार, योगेश शिंदे आदींना गौरविण्यात आले.
किसान दिन उत्साहात
सातारा : बँक ऑफ इंडियाच्या वतीने किसान दिन साजरा करण्यात आला. यावेळी बँकेचे उपमहाप्रबंधक मिलिंद गवसाने, कृषी संचालक विजयकुमार राऊत, अमोल गोडसे, प्रकाश शिंदे, संतोष पवार, अमित घोरपडे उपस्थित होते.