भाजप महिला मोर्चा जिल्हा सरचिटणीसपदी सविता पवार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2021 04:39 IST2021-04-01T04:39:26+5:302021-04-01T04:39:26+5:30
सातारा : भारतीय जनता पक्षाच्या महिला मोर्चा सातारा जिल्हा सरचिटणीसपदी सविता उमेश पवार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. भाजपचे ...

भाजप महिला मोर्चा जिल्हा सरचिटणीसपदी सविता पवार
सातारा : भारतीय जनता पक्षाच्या महिला मोर्चा सातारा जिल्हा सरचिटणीसपदी सविता उमेश पवार यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
भाजपचे जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्ष डॉ. सुरभी भोसले यांच्या हस्ते संगम माहुली येथील सविता उमेश पवार यांना महिला मोर्चा जिल्हा सरचिटणीसपदाचे नियुक्तीपत्र देण्यात आले. यावेळी जिल्हा सरचिटणीस विठ्ठल बलशेटवार, सातारा शहराध्यक्ष विकास गोसावी, ग्रामीणचे अध्यक्ष राजेंद्र इंगळे, जिल्हा उपाध्यक्ष राहुल शिवनामे, चंदन घोडके, मनीषा पांडे, वैशाली टंकसाळे, हेमांगी जोशी, अश्विनी हुबळीकर, नेहा खैरे, कुंजा खंदारे, सुरेखा पवार, निर्मला शिंदे, अनघा शिवनामे, अमृता शिवनामे, सरपंच प्रवीण शिंदे, उद्धव सावंत, विठ्ठल बरकडे, उमेश पवार, हनुमंत सावंत, नारायण सावंत, प्रकाश नेवसे, वैभव शिंदे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
(सविता पवार यांचा आयकार्ड फोटो आहे)