पाण्याने तारले.. ..अवकाळीने मारले!

By Admin | Updated: March 17, 2015 00:12 IST2015-03-16T22:39:37+5:302015-03-17T00:12:00+5:30

फलटणमधील स्थिती : शेतकरी हवालदिल

Saved with water .. | पाण्याने तारले.. ..अवकाळीने मारले!

पाण्याने तारले.. ..अवकाळीने मारले!

आदर्की : फलटण तालुक्याच्या ८४ गावचा दुष्काळी शिक्का पुसण्यासाठी युती शासनाने कृष्णा खोरे महामंडळाची स्थापना करून धोम-बलकवडी प्रकल्पासाठी तालुक्याची एकहाती सत्तेचा वापर करून १५ वर्षांत फलटण तालुक्याचा दुष्काळी भागातील सालपे व उपळवेपर्यंत पाणी पोहचल्यामुळे पाण्याचा दुष्काळ हटला; परंतु गत आठवड्यात पडलेल्या पावसाने अवकाळी दुष्काळ पडला असल्याची चर्चा शेतकरी वर्गात सुरू आहे.शिवाजीराजे निंबाळकर, चिमणराव कदम, डॉ. कृष्णचंद्र भोईटे, हिंदुराव नाईक-निंबाळकर, सुभाषराव शिंदे यांनी पाणी प्रश्न सतत शासन दरबारी जीवंत ठेवल्यामुळे १९९५ मध्ये युती सरकारला कृष्णा खोरे महामंडळाची स्थापना फलटण येथे येऊन कर्ज रोखेचा शुभारंभ केला. त्यानंतर रामराजे नाईक-निंबाळकर यांनी धोम-बलकवडी धरणाचे काम व उजव्या कालव्यासाठी विशेष प्रयत्न केले. राज्य व केद्राकडून निधी उपलब्ध करून १७ बोगदे तेवढेच सेतू उभारून अशक्यप्राय पाणी उपळवे, बाणगंगेत पोहचल्याने पाण्याचा दुष्काळ अंतश: संपला; परंतु अवकाळी पावसाने गहू, ज्वारी, मका, डाळींब, आंबा पिकावर घाला घातला अन् शेतकरी वर्गावर अस्मानी संकट कोसळले. पावसाची नोंद २० मि.मी. झाली. शासनाने पंचनामे केले. अवकाळी दुष्काळी पडल्याची चर्चा सुरू आहे. (वार्ताहर)

मालोजीराजेंचे विशेष प्रयत्न...
फलटण तालुका स्वातंत्र्यपूर्ण काळात निसर्गाच्या लहरी पाण्यावर अवलंबून होता; परंतु पावसाळ्यात पाऊस पडतच होता; पण वर्षातील सहा महिनेच शेती पिकायची. फलटण संस्थानचे अधिपती श्रीमंत मालोजीराजे नाईक-निंबाळकर यांनी निरा उजवा कालव्यासाठी विशेष प्रयत्न केल्यामुळे फलटण शहराबरोबर तालुक्याचा उत्तरपूर्व भागातील शेती बागायती झाली. त्यानंतर उर्वरित ८४ गावाला दुष्काळी भागास पाणी मिळाले.

Web Title: Saved with water ..

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.