‘यूपीएससी’त सातारी पताका

By Admin | Updated: June 13, 2014 02:03 IST2014-06-13T01:21:50+5:302014-06-13T02:03:24+5:30

कऱ्हाड-लोणंद : अभय येडगे, मयूर गोवेकर यांचे उज्ज्वल यश

'Satyarti' in 'UPSC' | ‘यूपीएससी’त सातारी पताका

‘यूपीएससी’त सातारी पताका

मसूर/लोणंद : केंद्रीय लोकसेवा आयोगाने घेतलेल्या परीक्षेत कऱ्हाड तालुक्यातील अभयचीवाडी येथील अमोल जगन्नाथ येडगे व लोणंद येथील मयूर रतिलाल गोवेकर यांनी उज्ज्वल यश संपादन करत सातारच्या शिरपेचा मानाचा तुरा खोवला आहे. अमोल येडगे याने देशात २५४ वा तर मयूर गोवेकर याने देशात ३४७ वा क्रमांक मिळवून भारतीय प्रशासकीय सेवेत स्थान मिळवले आहे. केंद्रीय लोकसेवा आयोगाने घेतलेल्या या परीक्षेसाठी देशभरातील सुमारे ४ लाखाहून अधिक विद्यार्थी बसले होते.
अमोलने शिक्षण पूर्ण झाल्यानंतर टाटा टेक्नॉलॉजी कंपनीत नोकरी केली. त्यानंतर गेल्या दीड वर्षांपासून त्याने केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेचा अभ्यास सुरु केला होता. अभ्यासाच्या तयारीसाठी अमोल काही दिवस दिल्लीतही होता.
अमोल येडगे याने आपले प्राथमिक व माध्यमिक शिक्षण यशवंतनगर येथील यशवंतराव चव्हाण विद्यालयात पूर्ण केले. अकरावी व बारावीचे शिक्षण कऱ्हाडच्या यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात घेतले. दहावी तसेच बारावीच्या परीक्षेतही अमोलने गुणवत्ता यादीत स्थान मिळवले होते. २0११ साली पुणे येथील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातून आपले इलेक्ट्रॉनिक्समधील पदवीचे शिक्षण पूर्ण केले.
शिक्षण पूर्ण झाल्यानंतर टाटा टेक्नॉलॉजी कंपनीत नोकरी केली. त्यानंतर गेल्या दीड वर्षांपासून अमोलने केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेचा अभ्यास सुरू केला होता. परीक्षेच्या तयारीसाठी अमोलने स्वयंअध्ययन व ग्रुप डिस्कशनवर अधिक भर दिला. अभ्यासाच्या तयारीसाठी अमोल काही दिवस दिल्लीतही होता.
अमोल येडगेचे मूळगाव अभयचीवाडी असून, त्याचे आईवडील शेती करतात. मुळातच हुशार असल्यामुळे अमोल पहिली ते बारावीपर्यंत शिक्षण घेण्यासाठी चुलते रघुनाथ येडगे यांच्याकडे यशवंतनगर येथे राहत होता. रघुनाथ येडगे सह्याद्री साखर कारखान्यात नोकरी करतात. अमोल केंद्रीय लोकसेवा आयोग परीक्षेत उत्तीर्ण झाल्याची माहिती मिळताच यशवंतनगर तसेच अभयचीवाडी येथील ग्रामस्थांनी जल्लोष केला.
मयूर गोवेकर याचे मूळ गाव फलटण तालुक्यातील कोरेगाव. गोवेकर कुटुंबीय सध्या लोणंद येथे राहत आहेत. त्याचे आई-वडील शिक्षक आहेत. आई खाशीबाई या साखरवाडी येथे तर वडील रतिलाल गावेकर हे देऊर येथे ज्ञानदानाचे काम करत आहेत. मयूरचे प्राथमिक शिक्षण लोणंद येथे तर माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण सातारा येथील सयाजीराव विद्यालय व यशवंतराव चव्हाण सायन्स कॉलेज येथे झाले. त्यानंतर पुणे येथून त्याने बी. टेक.ची
पदवी घेतली. भारतीय प्रशासन सेवेत जाण्याचं स्वप्न असल्याने त्याने तयारी सुरू केली होती. सीईटी परीक्षेतही तो कोल्हापूर विभागात प्रथम आला होता. (वार्ताहर)

Web Title: 'Satyarti' in 'UPSC'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.