साताऱ्याच्या चित्रकाराचे तेंडुलकरांकडून कौतुक
By Admin | Updated: August 7, 2014 00:13 IST2014-08-06T22:08:58+5:302014-08-07T00:13:56+5:30
पुण्यात प्रदर्शन : कलावंतांना वाचन वाढविण्याचे रवी परांजपे यांचे आवाहन

साताऱ्याच्या चित्रकाराचे तेंडुलकरांकडून कौतुक
सातारा : पुण्यातील लेट आॅर्ट गॅलरी येथे साताऱ्यामधील युवा चित्रकार अमित ढाणे आणि त्याच्या सहकाऱ्यांच्या कलाकृतींचे प्रदर्शन भरविण्यात आले आहे. जागतिक कीर्तीचे चित्रकार रवी परांजपे व प्रसिद्ध व्यंगचित्रकार मंगेश तेंडुलकर यांच्या हस्ते आणि प्रा. सुधाकर चव्हाण व प्रसिद्ध चित्रकार मारुती पाटील यांच्या उपस्थितीत प्रदर्शनाचे उद्घाटन झाले.
कला क्षेत्रात पुढे जायचे असेल तर प्रथम स्वत:ची स्वतंत्र शैली विकसित करायला हवी. चित्रकाराने चांगली पुस्तकेही वाचायला हवीत, असे मत रवी परांजपे यांनी व्यक्त केले. रुढी व परंपरा ही गंगेच्या प्रवाहाप्रमाणे आहे. कलाही त्याप्रमाणेच असावी.’
याप्रसंगी लेट आर्ट गॅलरीतर्फे पहिली स्कॉलरशिप अमित ढाणे याला देण्यात आल्याबद्दल रवी परांजपे यांच्या हस्ते अमितचा सत्कार करण्यात आला.
या प्रदर्शनास गॅलरीचे प्रमुख रश्मी तपाडिया व कपील तपाडिया, कलाध्यापक चंद्रकांत ढाणे व पुण्यातील विविधि कला महाविद्यालयातील विद्यार्थी उपस्थित होते. (प्रतिनिधी)