‘सातारी बाजीरावां’मुळे ‘फिल्मी मस्तानी’ त्रस्त!

By Admin | Updated: October 9, 2015 23:39 IST2015-10-09T21:01:07+5:302015-10-09T23:39:41+5:30

वाईत चित्रीकरणाचा सेट : साताऱ्यामधील गुंडांच्या दंडेलशाहीमुळे फिल्म निर्माता ‘पॅकअप’च्या तयारीत

'Satyarthi Bajirivana' 'Film Mannani' stricken! | ‘सातारी बाजीरावां’मुळे ‘फिल्मी मस्तानी’ त्रस्त!

‘सातारी बाजीरावां’मुळे ‘फिल्मी मस्तानी’ त्रस्त!

पांडुरंग भिलारे -- वाई  -चित्रपटाच्या चित्रीकरणासाठीचा ‘हॅपनिंग स्पॉट’ अशी ओळख असणाऱ्या वाई तालुक्यात आता गुंडगिरी बोकाळली आहे. गुरूवारी साताऱ्यातील काही गुंडांनी दमदाटी करत बाजीराव मस्तानीच्या सेटवर दंडेलशाही करण्याचा प्रयत्न केला. यापुवीर्ही अशा घटना घडल्याने चित्रीकरणाची पंढरी असणारा वाई तालुका बदनाम होत असून स्थानिकांसह तालुक्यातील व्यवसायिकांचे लांखो रूपयांचे नुकसान होत आहे. दसवडी ता. वाई येथे गेले काही दिवसापासून बाजीराव मस्तानी या हिंदी चित्रपटाचे चित्रीकरण सुरू आहे. गुरुवारी साताऱ्यातील काही गुुंडांनी चित्रपटाचा निमार्ता व दिग्दर्शक यांना ओलीस ठेवण्याचा प्रयत्न केला. चित्रकरणात सहभागी असणारे वाई व परिसरातील युवकांनी विरोध केल्याने मोठा अनर्थ टळला. सहयाद्रीच्या कुशीत वसलेला वाई शहर व परिसर हा अतिशय निसर्गरम्य आहे. वाईला दक्षिण काशी संबोधले जाते त्यामुळे कृष्णा नदीवर असणारे सात घाट, महागणपती मंदीर, मेणवलीचा वाडा, घाट , धोम धरण तसेच पश्चिम भागातील नयनरम्य परिसर यामुळे सर्व भाषामधील चित्रपट निर्मात्यांना या परिसराची नेहमीच भुरळ पडत आलेली आहे. गेल्या अनेक वषार्पासून या परिसरात विविध चित्रपटांचे चित्रीकरण झालेले आहे. त्यामध्ये मृत्युदंड, गंगाजल, जिस देश मे गंगा रहता है, स्वदेश , दंबग, चैनई एक्सप्रेस, असे अनेक हिंदी, मराठी , तमिळी, भोजपुरी भोषेतील चित्रपट तसेच हिंदी, मराठी मालीका जाहिरातींचे चित्रीकरण झाल्याने हा परिसर चित्रपट सृष्टीसाठी चित्रिकरणांचे महत्वाचे ठिकाण चित्रपट नगरी म्हणून नावारूपास आला होता. विविध चित्रिकरणांमुळे शहरातील हॉटेल्स-लॉज, वहानधारक, कॅटर्स, विविध गांवाच्या ग्रामपंचायतींना मिळणारा महसूल तसेच स्थानिक नागरीकांना मिळत असणारा रोजगार हा मोठया प्रमाणात उपलब्ध होत असे.मात्र, काही लोकांच्या वैयक्तीक स्वाथार्साठी चित्रीकरणाला वेठीस धरण्यात आले. त्यामुळे या परिसराचे नाव बदनाम झाले व या गुंडप्रवृत्तीच्या लोंकाना कटांळून चित्रपट सृष्टीने गेले काही दिवस या परिसरात चित्रीकरण न करण्याचा निर्णय घेतला. वाई शहरासह परिसरातील लोंकाचा हातचा रोजगार जावून व्यवसायिकांचे अपरिमित नुकसान झाले आहे. अनेक खंडानतंर वाईच्या पश्चिम भागात बाजीराव मस्तानी सारख्या ऐतिहासिक चित्रपटाचे चित्रीकरण आले होते. ते काही गुंडप्रवृत्तीच्या लोंकामुळे बंद पडणार असल्याची चर्चा परिसरात आहे. चित्रपट निर्मात्याची या चित्रीकरणाचा सेट दुस-या ठिकाणी हलविण्याची मानसिकता झाली आहे. ही बाब अतिशय गंभीर असून वाई तालुक्यासाठी बदनामी कारक आहे. तरी जिल्हा पोलिस प्रशासन , लोकप्रतिनिधींनी वेळीच गुंडप्रवृत्तींना आवर न घातल्यास वाई तालुक्यातील चित्रीकरण कायमचे बंद होण्याच्या मार्गावर आहे.

चित्रीकरणाला संरक्षण देण्याची गरज
वाई व परिसरात मोठया प्रमाणावर होणारे चित्रीकरण काही मुठभर लोकांच्या वैयक्तीक स्वाथार्मुळे बंद पडण्याच्या मार्गावर असून स्थानिक नागरीकासह व्यवसायिकांचे लाखों रूपयांचे नुकसान होत आहे तरी पोलिस प्रशासनाने व लोकप्रतिनिधींनी लक्ष घालून तालुक्यात येणा-या चित्रीकरणाला संरक्षण देण्यात यावे असे मत स्थानिक व्यवसायिकांनी बोलून दाखविले.

राजकीय पक्ष, संघटनांच्या नावाने गुंडगिरी
या परिसरात अनेक वेळा चित्रीकरणाच्या वेळी चित्रीकरणासाठी लागणारे सर्वप्रकारचे ठेके मिळणे, पैशाची मागणी विविध राजकीय पक्ष, संघटनांच्या नावाखाली मागणी केली जात आहे.

वाई शहर व ग्रामीण भागात अनेक ठिकाणी यापूर्वी चित्रपटांचे चित्रीकरणातून स्थानिकांना रोजगार मिळतो. चित्रीकरण पूर्ववत होण्यासाठी प्रयत्न व्हावेत.
- संतोष तांबे, सरपंच, मेणवली.

Web Title: 'Satyarthi Bajirivana' 'Film Mannani' stricken!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.