साताऱ्याच्या अधिकाऱ्यांना मुंबईत ‘त्रिवार’ सलाम !
By Admin | Updated: April 20, 2016 23:33 IST2016-04-20T23:33:55+5:302016-04-20T23:33:55+5:30
उत्कृष्ट कार्य: अश्विन मुदगल, अभिजित बापट, विद्या पोळ यांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान

साताऱ्याच्या अधिकाऱ्यांना मुंबईत ‘त्रिवार’ सलाम !
सातारा : विविध क्षेत्रांत उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल जिल्हाधिकारी अश्विन मुदगल, सातारा पालिकेचे मुख्याधिकारी अभिजित बापट व पाचगणी पालिकेच्या मुख्याधिकारी विद्या पोळ यांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते गौरव करण्यात आला.
राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागातर्फे नागरी सेवा दिनानिमित्त मुंबई येथील सह्याद्री राज्य अतिथीगृहात मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात राज्यासह सातारा जिल्ह्यातील तीन अधिकाऱ्यांचा उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल सन्मान करण्यात आला. यावेळी राज्याचे महसूलमंत्री एकनाथराव खडसे, उद्योगमंत्री तथा मुंबईचे पालकमंत्री सुभाष देसाई, खासदार अरविंद सावंत, राज्याचे मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय, सामान्य प्रशासन विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. पी. एस. मीना आदी व्यासपीठावर उपस्थित होते.
मुख्यमंत्री म्हणाले, ‘सामाजिक, आर्थिक परिवर्तनाचे माध्यम म्हणून लोकशाहीमध्ये प्रशासन कार्यरत असते. सामाजिक आर्थिक परिवर्तनाच्या माध्यमातून सामान्य नागरिकांच्या मनातील महाराष्ट्र घडविण्यासाठी प्रशासनाने पुढाकार घ्यावा. (प्रतिनिधी)