स्वस्तातल्या बिहारी आंब्यांना साताऱ्यात मागणी !

By Admin | Updated: June 8, 2014 00:52 IST2014-06-08T00:47:23+5:302014-06-08T00:52:51+5:30

चवीला इतर आंब्यापेक्षा वेगळा

Satyaraya demand in the Bihar mango cheap! | स्वस्तातल्या बिहारी आंब्यांना साताऱ्यात मागणी !

स्वस्तातल्या बिहारी आंब्यांना साताऱ्यात मागणी !

सातारा : शहरात अनेक प्रांतांतून मोठ्या प्रमाणावर विविध जातींचे आंबे विक्रीसाठी येतात. मात्र, यंदा प्रथमच बिहार येथून ‘कद्दूस’ जातीचा आंबा सातारकरांना चाखायला मिळणार आहे. हा आंबा चवीला इतर आंब्यापेक्षा वेगळा असल्याने ग्राहकांकडून या आंब्याची मागणी होत आहे.
सध्या बाजारपेठेत हापूस व पायरी आंब्यांची आवक कमी झाली आहे. त्यामुळे गुजरातहून लंगडा, दशरा, केशर, चोसा आदी जातींचे आंबे दाखल झाले आहेत. परदेशात आंब्यांची निर्यात न झाल्याने सर्वत्र आंब्यांची आवक मोठ्या प्रमाणावर आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना परवडेल अशा किमतीत आंबे उपलब्ध होत आहेत. आंब्याला वाढती मागणी असून, १०० ते ३०० रुपयांपर्यंत डझनाचा भाव राहिला आहे.
गतवर्षीच्या तुलनेत यंदा आंब्यांची मोठ्या प्रमाणावर आवक झाल्याने आमरस सर्वसामान्यांच्या ताटात दिसू लागले आहे.
सामान्यांनाही परवडणारे दर आणि उत्कृष्ट फळ यामुळे उन्हाळ्याच्या तडाख्यात मांसाहाराला फाटा देत अनेक घरांमध्ये आमरसाचा बेत सुरू आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Satyaraya demand in the Bihar mango cheap!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.