शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

साता-यात लष्करातील जवानाच्या पत्नीची आत्महत्या 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2018 13:40 IST

घरगुती कारणातून सैन्य दलातील जवानाच्या पत्नीने विष प्राशन करून राहत्या घरात शनिवारी रात्री आत्महत्या केली. स्वाती निंबाळकर (वय ३०,रा. कोंडवे, ता. सातारा) असे आत्महत्या केलेल्या महिला पोलीस कर्मचा-याचे नाव आहे. त्या मुंबई पोलीस दलात कार्यरत होत्या. 

सातारा : घरगुती कारणातून सैन्य दलातील जवानाच्या पत्नीने विष प्राशन करून राहत्या घरात शनिवारी रात्री आत्महत्या केली. स्वाती निंबाळकर (वय ३०,रा. कोंडवे, ता. सातारा) असे आत्महत्या केलेल्या महिला पोलीस कर्मचा-याचे नाव आहे. त्या मुंबई पोलीस दलात कार्यरत होत्या. याबाबत अधिक माहिती अशी की, स्वाती लखन निंबाळकर यांचे दोन वर्षांपूर्वी सैन्य दलात कार्यरत असलेल्या लखन निंबाळकर यांच्यासोबत लग्न झाले होते. त्या मुंबईतील अंधेरी पोलीस ठाण्यात कार्यरत होत्या तर लखन यांनाही सुटी असल्यामुळे त्या चार दिवस सुटी घेऊन आपल्या सासरी कोंडवे येथे आल्या होत्या. शनिवारी रात्री नेहमीप्रमाणे सर्वांनी जेवण केले. त्यानंतर सर्वजण झोपी गेले. यावेळी अचानक स्वाती यांनी विष प्राशन केले. हा प्रकार पती लखन यांच्या निदर्शनास आल्यानंतर स्वाती यांना त्यांनी रात्री अकराच्या सुमारास तत्काळ जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. रुग्णालयातील पोलिसांनी स्वाती यांचा जबाब नोंदविला. ‘टेन्शनमुळे मी विषारी औषध पिले असून, याला कोणालाही जबाबदार धरू नये,’ असा जबाब स्वाती यांनी यावेळी पोलिसांकडे दिला. रात्री बारापर्यंत स्वाती यांची प्रकृती चांगली होती. मात्र, साडेबारानंतर अचानक प्रकृती चिंताजनक बनली. मध्यरात्री दीडच्या सुमारास उपचार घेत असताना स्वाती यांचा मृत्यू झाला.दरम्यान, स्वाती यांच्या आत्महत्येला सासरची मंडळीच जबाबदार असल्याचा आरोप करत मृतदेह ताब्यात घेण्यास माहेरच्या नातेवाइकांनी नकार दिला. मात्र, पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी करू, असे आश्वासन दिल्यानंतर मृतदेह ताब्यात घेतला. त्यानंतर रविवारी दुपारी स्वाती यांच्यावर कोंडवे येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.स्वाती यांचे सातारा तालुक्यातील बोरखळ हे माहेर असून, सुमारे चार वर्षांपूर्वी त्या मुंबई पोलीस दलात भरती झाल्या होत्या. स्वाती यांना अकरा महिन्यांचा एक मुलगाही आहे. 

टॅग्स :Satara areaसातारा परिसरSuicideआत्महत्या