साताऱ्यातील चित्रकाराचे मुंबईत आज प्रदर्शन
By Admin | Updated: October 27, 2015 00:22 IST2015-10-26T20:49:38+5:302015-10-27T00:22:31+5:30
स्त्री सौंदर्य : प्रमोद कुर्लेकर यांच्या कलाकृती

साताऱ्यातील चित्रकाराचे मुंबईत आज प्रदर्शन
सातारा : मुंबईतील जहाँगिर आर्ट गॅलरीत प्रदर्शन भरले जावे, तेथे कला क्षेत्रातील दिग्गजांनी भेट देऊन आपल्या चित्रांची वाहवा करावी, असे प्रत्येकाचे स्वप्न असते. हे स्वप्न साकारण्यासाठी सातारा येथील प्रमोद कुर्लेकर यांचे मंगळवार, दि. २७ पासून चित्रांचे प्रदर्शन भरवले जात आहे. कुर्लेकर यांचे जहाँगिरमध्ये तिसऱ्यांदा प्रदर्शन भरत आहे.
सातारा तालुक्यातील नुने येथील व्यक्तीचित्रासाठी प्रसिद्ध असलेले चित्रकार प्रमोद कुर्लेकर हे मंगळवारी जहाँगिरमध्ये तिसऱ्यांदा
चित्रप्रदर्शन भरवून विक्रम करणार आहेत.
कुर्लेकर हे अनुभवावर आधारित चित्रे साकारण्यासाठी काही मॉडेल्स बनवून मुंबई आणि परिसरात गेली दीड वर्ष चित्रे काढत आहेत. त्यातील निवडक चित्रांचे प्रदर्शन भरवले जाणार आहे. हे प्रदर्शन २ नोव्हेंबरपर्यंत पाहण्यास उपलब्ध आहेत.
स्त्री सौंदर्य आणि मुलांमधील निरागसता, हा विषय त्यांनी यंदा घेतला आहे. यापूर्वी २००७ मध्ये भरविलेल्या प्रदर्शनात स्त्री सौंदर्य हा विषय घेतला होता. तर २०११ मध्ये झालेल्या प्रदर्शनात स्त्री सौंदर्याचा ग्रेस आणि बालकांमधील निरागसता हा विषय प्रदर्शनास मांडला होता. (प्रतिनिधी)