साताऱ्याच्या नृत्यांगना निघाल्या युरोपला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2019 23:27 IST2019-06-28T23:27:43+5:302019-06-28T23:27:52+5:30
सातारा : येथील सक्षम अकादमीच्या नऊ नृत्यांगना वैशाली राजेघाटगे यांच्या नेतृत्वाखाली ४ ते १२ जुलैदरम्यान युरोप दौºयावर जाणार आहेत. ...

साताऱ्याच्या नृत्यांगना निघाल्या युरोपला
सातारा : येथील सक्षम अकादमीच्या नऊ नृत्यांगना वैशाली राजेघाटगे यांच्या नेतृत्वाखाली ४ ते १२ जुलैदरम्यान युरोप दौºयावर जाणार आहेत. न्यू प्राग डान्स फेस्टिव्हलमध्ये या नृत्यांगना भारतीय संस्कृतीचे दर्शन नृत्याद्वारे घडविण्याबरोबरच ‘जागतिक तापमानवाढ’ या विषयावर विशेष रंगमंचीय अविष्कार सादर करणार आहेत.
नृत्याच्या क्षेत्रात मानाच्या समजल्या जाणाºया न्यू प्राग महोत्सवात जगभरातील सहाशे संघांमधून सक्षम अकादमीच्या संघाची निवड झाली आहे. यापूर्वी सादर केलेल्या कार्यक्रमांच्या आधारावर ही निवड करण्यात आली आहे. महोत्सवात या नृत्यांगना एकूण चार कार्यक्रम सादर करणार असून, दि. ७ ते १० जुलैदरम्यान दररोज ते सादर होणार आहेत. जोगवा, जागतिक तापमानवाढीवरील विशेष नृत्याविष्कार, शास्त्रीय आणि लावणी असे चार प्रकार त्या सादर करणार आहेत.
या संघात वैशाली राजेघाटगे यांच्यासह विद्धी मुंदडा, शीतल लांडगे, शलाका निकम, प्रज्ञा चव्हाण, समृद्धी शहा, काजल निकम, दीपा गोवर आणि सुनीता राजेघाटगे यांचा समावेश आहे. जोगवा नृत्याबरोबर महिला सक्षमीकरणाविषयी खास सादरीकरण होणार असून, भारतीय शास्त्रीय नृत्य आणि लोकनृत्य दोहोंचे प्रतिनिधित्व या कार्यक्रमात असेल. जगभरातून येणारे संच बॅले, रोमन डान्स, हिप-हॉप असे विविध नृत्यप्रकार या महोत्सवात सादर करतात. विशेषत: पाश्चात्य शैलीतील नृत्ये मोठ्या संख्येने महोत्सवात सादर होतात.
युरोपातील नृत्यप्रकार शिकण्याची संधीही साताºयाच्या संघास मिळणार असून, त्यासाठी विशेष कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. भारतातून साताºयाच्या संघाची निवड झाल्याने विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी वैशाली राजेघाटगे यांचे कौतुक केले.