सातारकरांनी अनुभवली ढगांची वारी!
By Admin | Updated: May 31, 2017 23:15 IST2017-05-31T23:15:56+5:302017-05-31T23:15:56+5:30
सातारकरांनी अनुभवली ढगांची वारी!

सातारकरांनी अनुभवली ढगांची वारी!
लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : सातारकरांसाठी बुधवारचा दिवस विलक्षणीय ठरला. यवतेश्वर घाटातून कास पठाराकडे फिरायला गेलेल्या पर्यटकांना एक वेगळं दृश्य पहायला मिळालं. सातारा शहराच्या आसपास अवकाशात जणू ढगांचा महापूर आल्याचा भास अनेकांना झाला.
सातारा शहर दरीत वसलेलं. हे शहर चारही बाजुंनी सह्याद्रीच्या पर्वतरांगांनी वेढलेले. त्यामुळे इथला निसर्ग नेहमीच आगळा वेगळा भासतो.
सज्जनगड परळी खोऱ्यातून आलेल्या पांढऱ्या शुभ्र ढगांनी यवतेश्वरच्या घाटातून सातारा शहराकडे जणू झेप घेतली. ढगांचा हा महापूर कोसळणाऱ्या धबधब्यासारखं दिसत होता. हे दृश्य पाहण्यासाठी शेकडो सातारकर यवतेश्वर घाटात उत्साहाने गेले.