पर्यावरणपूरक पाणपोईबद्दल नागरिकांतून समाधान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 05:23 IST2021-09-02T05:23:29+5:302021-09-02T05:23:29+5:30
कराड : येथील सोमवार पेठेमध्ये नगरसेवक सुहास जगताप यांच्या संकल्पनेतून व स्वखर्चातून नागरिकांना पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी, या ...

पर्यावरणपूरक पाणपोईबद्दल नागरिकांतून समाधान
कराड : येथील सोमवार पेठेमध्ये नगरसेवक सुहास जगताप यांच्या संकल्पनेतून व स्वखर्चातून नागरिकांना पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी, या अनुषंगाने जुन्या काळातील रांजणाला आकर्षकपणे रंग देऊन पर्यावरण संदेश देणारी पाणपोई बसवण्यात आली आहे. त्यांच्या या उपक्रमाबद्दल नागरिकांतून समाधान व्यक्त केले जात आहे.
सुहास जगताप यांनी आतापर्यंत अनेक सामाजिक उपक्रम राबवले आहेत. सामाजिक प्रबोधनाबरोबरच त्यांनी गतवर्षी कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर स्वखर्चाने शहरात नागरिकांच्या आवश्यकतेनुसार सॅनिटाईज फवारणी केली. तसेच कडक लॉकडाऊनच्या कालावधीमध्ये नागरिकांना दूध, भाजी घरोघरी पोहोच केली. सोमवार पेठेतील मोठ्या बिल्डिंगमध्ये शहरातील महत्त्वाचे फोन नंबरचे फलक लावले आहेत.
जुन्या काळामध्ये घराघरांमध्ये रांजण असायचे, मात्र असे रांजण सध्याच्या पिढीला माहीत नसतात. त्यामुळे जुन्या काळातील वस्तू नवीन पिढीला माहिती व्हाव्यात, या अनुषंगाने जगताप यांनी रांजणांवर रंगकाम करून घेऊन ही आकर्षक पाणपोई सोमवार पेठेमध्ये ज्याठिकाणी रिकामी जागा आहे, त्याठिकाणी कोपऱ्यावर ठेवण्यात आले आहेत.
पूर्वीच्या काळी ग्रामीण भागामध्ये पिण्याचे पाणी रांजणामध्ये साठवले जायचे. रांजण हे मातीपासून बनवले जाते. यात पाणी थंड राहते. रांजणाचा आकार मोठा असतो. त्यात सुमारे २० लिटर ते ५० लिटर पाणी बसते. रांजण हे पाणी धारण क्षमतेनुसार ते वेगवेगळ्या आकाराचे असतात. सुहास जगताप यांनी नवीन पिढीला रांजणाची माहिती व महत्त्व कळावे तसेच ये-जा करणाऱ्या नागरिकांची तहान भागावी, यासाठी पाणपोई बसवली आहे.
फोटो