देशभक्तीसाठी सातारकरांची ७२ किलोमीटरची दौड...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 09:09 IST2021-02-05T09:09:57+5:302021-02-05T09:09:57+5:30
सातारा : देशाभिमानासाठी साताऱ्यातील ३५हून अधिक नागरिक प्रजासत्ताक दिनानिमित्त ७२ किलोमीटर धावणार तसेच सायकलिंग करत आहेत. यामधील १८ जणांनी ...

देशभक्तीसाठी सातारकरांची ७२ किलोमीटरची दौड...
सातारा : देशाभिमानासाठी साताऱ्यातील ३५हून अधिक नागरिक प्रजासत्ताक दिनानिमित्त ७२ किलोमीटर धावणार तसेच सायकलिंग करत आहेत. यामधील १८ जणांनी सोमवारी रात्री सव्वाआठच्या सुमारास दौड सुरू केली. मंगळवारी (दि.२६) सकाळी साडेआठच्या सुमारास पोवई नाक्यावर हे ही दौड संपणार आहे.
‘इंडिया प्राइड अल्ट्रा रन राइड’ अंतर्गत साताऱ्यातील नागरिक यामध्ये सहभागी होतात. यावर्षी ७२वा भारतीय प्रजासत्ताक दिन आहे. त्यामुळे ७२ किलोमीटर रनिंग आणि सायकलिंगचे आयोजन करण्यात आले आहे. सोमवारी रात्री सव्वाआठ वाजता पोवई नाक्यावरून ७२ किलोमीटर धावण्यास सुरुवात झाली. डॉ. प्रताप गोळे व डॉ. संदीप काटे यांच्या उपस्थितीत फुगे आकाशात सोडून धावण्याला सुरुवात झाली. या दौडमध्ये १८ जण सहभागी झाले होते. पोवई नाका, राजवाडा, मंगळवार तळे, पुन्हा राजवाडा. पोलीस मुख्यालयमार्ग पोवई नाका असा हा मार्ग आहे. हे पाच किलोमीटरचे अंतर असून ऐकूण १४ फेऱ्या मारण्यात येणार आहेत. दि. २६ रोजी सकाळी धावणे थांबणार आहे.
फोटो दि.२५सातारा रन फोटो...
फोटो ओळ : सातारा येथील पोवई नाक्यावर सोमवारी रात्री १८ जणांनी धावण्यास सुरुवात केली. मंगळवारी सकाळपर्यंत ७२ किलोमीटरची दौड पूर्ण करण्यात येणार आहे. (छाया : नितीन काळेल)
......................................................