सातारा-लोणार गाडीला सातारकरांचा प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2021 04:33 IST2021-01-15T04:33:13+5:302021-01-15T04:33:13+5:30

सातारा : लॉकडाऊन काळात नोकरी व्यवसायाच्या निमित्ताने साताऱ्यात स्थायिक झालेल्यांना आपापल्या गावी जाता आले नव्हते. सातारकरांच्या मागणीचा विचार करून ...

Satarkar response to Satara-Lonar train | सातारा-लोणार गाडीला सातारकरांचा प्रतिसाद

सातारा-लोणार गाडीला सातारकरांचा प्रतिसाद

सातारा : लॉकडाऊन काळात नोकरी व्यवसायाच्या निमित्ताने साताऱ्यात स्थायिक झालेल्यांना आपापल्या गावी जाता आले नव्हते. सातारकरांच्या मागणीचा विचार करून राज्य परिवहन महामंडळाच्या मेढा आगाराने सातारा-लोणार ही गाडी सुरू केली होती. जलद असलेल्या या गाडीला सातारकरांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.

सातारा जिल्ह्यात मार्चमध्ये कोरोनाबाधित रुग्ण आढळले होते. तेव्हापासून संसर्ग नियंत्रणात आणण्यासाठी राज्य शासनाने सार्वजनिक वाहतूक व्यवस्था बंद करण्यात आली. तेव्हापासून सातारकरांना आपापल्या गावी जाता आले नव्हते. शाळकरी मुलांची उन्हाळा सुटी साताऱ्यात गेली होती. अनेक विवाहितांना आपापल्या गावी जाता आले नाही. त्यामुळे कधी जिल्ह्याबाहेर एसटी सुरू होणार याकडे लक्ष लागले होते. याबाबत एसटीच्या अधिकाऱ्यांकडे सतत विचारणा केली जात होती.

प्रवाशांच्या मागणीचा विचार करून राज्य परिवहन महामंडळाच्या मेढा आगाराने मेढा-लोणार ही गाडी सुरू केली. ही गाडी साताऱ्यातून सकाळी सात वाजता निघते. ती सातारा, फलटण, बारामती, कर्जत, जामखेड, बीड, जालना, सिंदखेडराजामार्गे लोणारला जाते. त्यानंतर ती साताऱ्याकडे परतीसाठी लोणारमधून सकाळी सातला निघते. या गाडीला सातारकरांचा प्रतिसाद चांगला मिळत आहे. याचा आणखी प्रवाशांनी लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Web Title: Satarkar response to Satara-Lonar train