शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

सातारकर नागरिकच पोलिसांच्या भूमिकेत, वाहनचालक त्रस्त, मालट्रक... वाहनांसाठी गतिरोधक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2017 12:19 IST

सातारकर नागरिकांना ट्रॅफिकजामचा फारसा अनुभवच नसतो. इनमिन तीन रस्ते अन् वाहनेही कमी. त्यामुळे काही मिनिटांत इच्छित ठिकाणी पोहोचले जाते; पण अलीकडे मालवाहू ट्रक रहदारीच्या ठिकाणी कित्येक तास थांबत असल्याने नवीनच समस्या उद्भवू लागल्या आहेत. दोन मिनिटांच्या अंतरावर जाण्यासाठी अर्धा तास थांबावे लागत आहे.

ठळक मुद्देदोन मिनिटांच्या अंतरासाठी अर्धा तासांचा खोळंबावाहनचालक मोडतात शिस्त व्यापाऱ्यांची रस्त्यावरच दुकानदारी

सातारा : सातारकर नागरिकांना ट्रॅफिक जामचा फारसा अनुभवच नसतो. इनमिन तीन रस्ते अन् वाहनेही कमी. त्यामुळे काही मिनिटांत इच्छित ठिकाणी पोहोचले जाते; पण अलीकडे मालवाहू ट्रक रहदारीच्या ठिकाणी कित्येक तास थांबत असल्याने नवीनच समस्या उद्भवू लागल्या आहेत. दोन मिनिटांच्या अंतरावर जाण्यासाठी अर्धा तास थांबावे लागत आहे.साताऱ्यातील वाहतूक हा एक अभ्यासाचाच विषय बनला आहे. वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी केएमएम प्रसन्ना पोलिस अधीक्षक असताना सम-विषम पार्किंग सुविधा सुरू झाली. एकेरी वाहतूक सुरू करण्यात आली. यामुळे काहीसा चांगला परिणाम दिसत असतानाच वाहनचालक शिस्त मोडताना दिसत आहेत.मोती चौक ते पाचशे एक पाटी चौक दरम्यानचा अरुंद रस्ता आहे. याच रस्त्यावर जागोजागी विक्रेते रस्त्यावर स्टॉल लावून बसलेले असतात. तेथेच हातगाडेवाले थांबलेले असतात. त्यामुळे वाहतुकीची मोठी कोंडी होत असते. त्यात एसटी निघाली असल्यास लांबपर्यंत रांगा लागलेल्या असतात.या वाहतुकीला कंटाळलेले वाहनचालक पर्यायी मार्ग म्हणून स्टेट बँकेपासून जुना मोटारस्टँडमार्गे जातात. या रस्त्याचा वापर करणाऱ्यांचे प्रमाणही वाढले आहे. परंतु या मार्गावरही मालवाहू ट्रक साहित्य उतरविण्यासाठी रस्त्यावर थांबलेले असतात.

त्यातच रस्त्याच्या कडेला काही गाड्या अस्ताव्यस्त लावलेल्या असल्याने दोन्ही बाजूंनी वाहतूक थांबते. त्यामुळे काही मीटरचा रस्ता ओलांडण्यासाठी अर्धा तास उशीर होत आहे. विशेष म्हणजे या रस्त्यापासूनच काही अंतरावर एक पोलिस चौकी आहे. परंत कोणीही मदतीला येत नाही.व्यापाऱ्यांची रस्त्यावरच दुकानदारीया रस्त्याच्या कडेला दुकाने असलेले व्यावसायिक केरसुणी, झाप, टोपली, झाडू, पतंग, पेपर डिश विकण्यासाठी रस्त्यावर मांडून रस्ता अडवत आहेत. त्यामुळे पादचाऱ्यांना चालत जाणेही अवघड जात आहे.

सातारा पालिका व पोलिसांनी या मार्गावरील अतिक्रमण दूर करावे. तसेच या मार्गावर अवजड वाहने उभी करण्यासाठी मज्जाव करावा. तसेच त्या वाहनांसाठी ठराविक वेळ ठरवून द्यावी, अशी मागणी होत आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरtraffic policeवाहतूक पोलीसroad safetyरस्ते सुरक्षा