शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
3
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
4
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
5
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
6
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
7
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
8
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
9
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
10
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
11
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
12
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
13
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
14
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
15
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
16
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
17
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
18
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
19
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
20
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

साताऱ्याचे नवे पोलीस अधीक्षक समीर शेख, अजय कुमार बंसल यांची बदली

By दत्ता यादव | Updated: October 20, 2022 22:27 IST

जिल्हा पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांची बदली झाली असून, त्यांच्या जागी  पोलीस अधीक्षक समीर शेख यांची नियुक्ती करण्यात आली आहे. 

सातारा :

जिल्हा पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांची बदली झाली असून, त्यांच्या जागी  पोलीस अधीक्षक समीर शेख यांची नियुक्ती करण्यात आली आहे. 

पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांनी दोन वर्षांपूर्वी जिल्हा पोलीस अधीक्षक म्हणून पदभार स्वीकारला होता. दोन वर्षांच्या काळात त्यांनी अनेक किचकट गुन्हे उघडकीस आणले. विशेषत:शंभरहून अधिक गुन्हेगारांना त्यांनी मोक्का लावला तर ७० हून अधिक टोळ्यांना त्यांनी तडीपार केले. कोरोना काळातही त्यांनी उत्तमरित्याकाम केल्याने त्यांचा राज्य शासनाकडून गाैरव करण्यात आला होता. पोलीस वसाहतीचे बांधकाम त्यांच्याच प्रयत्नाने सुरू झाले. हे काम आता अंतिम टप्यात आले आहे. तत्कालीन पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी पोलिसांना त्यांच्या वाढदिवसाला सुटी देण्याची प्रथा सुरू केली होती. ही परंपरा त्यांनी कायम ठेवली होती.

दरम्यान, साताऱ्याचे नवे पोलीस अधीक्षक म्हणून नियुक्ती झालेले समीर शेख हे यापूर्वी साताऱ्यात अप्पर पोलीस अधीक्षक म्हणून कार्यरत होते. त्यामुळे त्यांना साताऱ्यात काम करण्याचा चांगला अनुभव आहे. काही वर्षांपूर्वी खासदार उदयनराजे भोसले आणि आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या समर्थकांमध्ये सुरूचीवर राडा झाला होता. या प्रकरणात दोन्ही गटांतील शंभरहून अधिक कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणाचा तपास त्यावेळी समीर शेख हे स्वत: करत होते. तसेच पोक्सोचा गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपींवर तातडीने कारवार्इ व्हावी, यासाठी त्यांचे प्रयत्न असायचे. गणेशोत्सव, र्इद, दिवाळी या सणामध्ये जातीय सलोखा राहावा, यासाठी त्यांनी चांगले प्रयत्न केले होते.   

टॅग्स :Satara areaसातारा परिसर