साताऱ्याचा पारा १४ अंशांवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2021 04:41 IST2021-02-09T04:41:41+5:302021-02-09T04:41:41+5:30
सातारा : जिल्ह्यात मागील पाच दिवसांपासून थंडी कायम असून, किमान तापमानही कमी होत चालले आहे. सोमवारी तर साताऱ्यात १४ ...

साताऱ्याचा पारा १४ अंशांवर
सातारा : जिल्ह्यात मागील पाच दिवसांपासून थंडी कायम असून, किमान तापमानही कमी होत चालले आहे. सोमवारी तर साताऱ्यात १४ अंशांपर्यंत खाली पारा आला होता. त्यातच जिल्ह्यात थंडगार वारे वाहत असल्याने गारठाही कायम आहे.
जिल्ह्यात गेल्या वर्षी थंडीला वेळेत सुरुवात झाली असली तरी या ऋतूतील तापमानात सतत चढ-उतार होत आहे. कधी तापमान १२ अंशांपर्यंत खाली येते, तर काहीवेळा २०, २१ अंशांच्यावरही तापमान जाते. त्यामुळे सातारा जिल्ह्यातील नागरिक कधी थंडी, तर कधी उकाड्यालाही सामोर जात आहेत. मागीलवर्षी किमान सतत थंडी जाणवत होती. यंदा मात्र, तशी स्थिती राहिलेली नाही.
मागील आठ दिवसांपूर्वी जिल्ह्यातील किमान तापमान कधी १५, तर कधी १७ अंशांपर्यंत पोहोचले होते. त्यानंतर ते १२ अंशांपर्यंत खाली आलेले. परत ते वाढून १५ अंशांवर गेले. आता तर पारा १४ अंशांपर्यंत खाली आला आहे. त्यातच थंडगार वारे वाहत आहेत. यामुळे गारठ्यात आणखी वाढ झालेली आहे. यामुळे शहराच्या ठिकाणच्या बाजारपेठेत सायंकाळच्या सुमारास गर्दी कमी होताना दिसून येत आहे.
............................................................