शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

Satara ZP Election Voting 2026: सातारा जिल्ह्यात वडगावमध्ये किरकोळ वादावादी, दुपारी १२ पर्यंत २२ टक्के मतदान

By नितीन काळेल | Updated: February 7, 2026 12:41 IST

६५ गट, १२९ गणांसाठी मतदान सुरू; मोठ्या गावांच्या ठिकाणी मतदानासाठी रांगा

सातारा : जिल्ह्यात सातारा जिल्हा परिषदेच्या ६५ गट आणि ११ पंचायत समितीच्या १२९ गणांसाठी शनिवारी सकाळपासून मतदानाला सुरूवात झाली. सकाळी साडे नऊ वाजेपर्यंत ७ टक्के मतदान झाले होते. तर दुपारी बारापर्यंत मतदानाची टक्केवारी २२ पर्यंत गेली होती. वडगावमध्ये मतदानाच्या कारणावरून किरकोळ वादावादी निर्माण झाली होती. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्यामुळे परिस्थिती नियंत्रणात आली. या निवडणुकीसाठी एकूण २१ लाख ९४ हजार मतदार आहेत.सातारा जिल्हा परिषद आणि ११ तालुक्यांतील पंचायत समितींची सार्वत्रिक निवडणूक नऊ वर्षांनी होत आहे. जिल्हा परिषदेच्या ६५ गटांसाठी तर पंचायत समितीच्या १३० गणांसाठी निवडणूक जाहीर झाली होती. पण, माण तालुक्यातील आंधळी गणाची निवडणूक बिनविरोध झाली. त्यामुळे ६५ गट आणि १२९ गणांसाठी शनिवारी सकाळी साडे सात वाजल्यापासून मतदानाला सुरूवात झाली. सकाळच्या टप्प्यात मतदानाला उत्साह दिसून आला नाही. मात्र, दहा वाजल्यानंतर मतदार घराबाहेर पडले. त्यामुळे दुपारी १२ वाजेपर्यंत सुमारे २२ टक्क्यांपर्यंत मतदान पोहोचले होते. मोठ्या गावांच्या ठिकाणी मतदानासाठी रांगा लागल्या होत्या. तर बाहेरगावी असणाऱ्या मतदारांसाठी उमेदवारांनी वाहनांची व्यवस्था केली होती. या निवडणुकीत अधिकाधिक मतदान होईल यासाठी प्रशासनाने आवाहन केलेले आहे.महाबळेश्वर तालुक्यात सर्वाधिक ३४ टक्के मतदान...दुपारी १२ पर्यंत सातारा तालुक्यात २१ टक्के मतदान झाले होते. कराडला २१.६३ टक्के, पाटण १८.३३,  कोरेगाव २१.८३ टक्के, वाई २२.६७,  खंडाळा २१ टक्के, जावळी १८, फलटण २२.५७, माण तालुका  २४.३२ टक्के, खटाव तालुक्यात १९.६१ तर सर्वाधिक मतदान महाबळेश्वर तालुक्यात ३४.११ टक्के झाले होते.

English
हिंदी सारांश
Web Title : Satara ZP Election 2026: Minor Clash, 15% Voting Till Noon

Web Summary : Satara Zilla Parishad elections saw 15% voter turnout by noon. A minor clash occurred in Vadgaon, quickly controlled by police. Polling began for 65 ZP groups and 129 Panchayat Samiti constituencies after nine years.
टॅग्स :Zilla Parishad Electionजिल्हा परिषद निवडणूक २०२६Satara areaसातारा परिसरVotingमतदानPoliceपोलिस