सातारा : सातारा जिल्हा परिषदेचे २०२६-२७ वर्षाचे महसुली खर्चाचे ४५ कोटी ४० लाख रुपयांचे मूळ अंदाजपत्रक प्रशासकांनी सादर केले. यामध्ये एक लाख रुपये शिल्लक दाखविण्यात आली. तर अंदाजपत्रकात नवनवीन योजनांचा समावेश असून सर्वाधिक तरतूद ग्रामपंचायत विभागासाठी १७ कोटी ७४ लाख आणि बांधकाम विभागासाठी आठ कोटींची करण्यात आलेली आहे. तसेच शेतकऱ्यांना कडबाकुट्टी, शेळी गट वाटप करण्यात येणार आहे.सातारा जिल्हा परिषदेच्या स्थायी समिती सभागृहात मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक याशनी नागराजन यांनी मूळ अंदाजपत्रक सादर केले. यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी राहूल गावडे, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक विश्वास सीद, सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी नीलेश घुले, ग्रामपंचायत विभागाचे राहुल देसाई, महिला व बालविकास विभागाचे नागेश ठोंबरे, पाणी व स्वच्छता विभागाच्या प्रज्ञा माने, मुख्य लेखा व वित्त अधिकारी राहुल कदम यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.
विभागनिहाय तरतूद अशी...विभाग तरतूदसामान्य प्रशासन - १ कोटी ५० लाखशिक्षण - १ कोटी ८० लाखशिक्षण - ५ टक्के, देखभाल व दुरुस्ती - ८१ लाखबांधकाम - ८ कोटीलघुपाटबंधारे - ४० लाखआयुर्वेद - २० लाखआरोग्य - १ कोटी ४० लाखसार्वजनिक आरोग्य अभियांत्रिकी - ५० लाखकृषी - १ कोटी १० लाखपशुसंवर्धन - १ कोटी १० लाखसमाजकल्याण - ३ कोटी २२ लाखग्रामपंचायत - १७ कोटी ७४ लाखअर्थ - ३ कोटी ५५ लाखसमाजकल्याण दिव्यांग बांधव - ८२ लाखमहिला व बालकल्याण - १ कोटी ६१ लाखएकात्मिक बालविकास - १४ लाख
कामे अशी होणार; योजना अशा राबणार...शिक्षण - शैक्षणिक गुणवत्ता विकास कार्यक्रम, क्रीडा स्पर्धा; बाल आनंद मेळावे. माॅडेल स्कूल, शाळा देखभाल व दुरुस्ती.बांधकाम - जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवासस्थान तरतूद. विश्रामगृह दुरुस्ती, ग्रामीण रस्ते कामे करणे, नावीण्यपूर्ण योजना राबविणे.लघुपाटबंधारे - देखभाल अन् दुरुस्तीसाठी तरतूद.आरोग्य - आयुर्वेद औषध पुरवठा, संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा तरतूद, प्राथमिक आरोग्य केंद्रे वीजबिल, नावीण्यपूर्ण योजना आदींसाठी तरतूद.कृषी - शेतकऱ्यांना कडबाकुट्टी, ताडपत्री पुरवणे. सेंद्रीय शेतीस प्रोत्साहन, एचडी पाइप पुरविणे, सेंद्रिय फलोत्पादन, दुग्धोत्पादनासाठी निधीपशुसंवर्धन - पशुवैद्यकीय दवाखान्यांना औषध पुरवठा. शेळी गट वाटप, कामधेनू आधार योजना.समाजकल्याण - मागासवर्गीय वस्तीतील जोडरस्ते जोडणे, समाजमंदिर बांधणे, मागासवर्गीय व्यक्तींना झेराॅक्स मशीन पुरविणे, दिव्यांग बांधवांना घरकुल, तीनचाकी स्कूटर.ग्रामपंचायत - आपत्कालीन व्यवस्थेसाठी निधी, संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यासाठी ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात पाणी व स्वच्छतेसाठी तरतूद.महिला व बालकल्याण - सातवी ते १२ वीतील मुलामुलींना संगणक प्रशिक्षण, महिलांसाठी व्यावसायिक प्रशिक्षण, मुलींना ज्युदो कराटे प्रशिक्षण, लेडीज सायकल पुरवठा, अंगणवाडींना साहित्य पुरविणे.
Web Summary : Satara Zilla Parishad presented a ₹45.40 crore budget, prioritizing village development (₹17.74 crore) and construction (₹8 crore). Key initiatives include providing fodder cutters and goat units to farmers, alongside investments in education, healthcare, and infrastructure improvements across the district.
Web Summary : सतारा जिला परिषद ने ₹45.40 करोड़ का बजट पेश किया, जिसमें ग्राम विकास (₹17.74 करोड़) और निर्माण (₹8 करोड़) को प्राथमिकता दी गई। किसानों को चारा काटने की मशीनें और बकरी इकाइयां प्रदान करने के साथ-साथ शिक्षा, स्वास्थ्य सेवा और बुनियादी ढांचे में सुधार पर निवेश शामिल है।