शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात पाचव्या टप्प्यातील १३ लोकसभा मतदारसंघात अंदाजे ५४.३३ टक्के मतदान  
2
भगवान जगन्नाथ मोदींचे भक्त; संबित पात्रांच्या वक्तव्याने नवा वाद, विरोधकांनी BJP ला घेरले...
3
इराणमधील सत्तासंघर्षामधून इब्राहीम रईसींचा बळी? खोमेनींच्या मुलावर संशय, इराणमध्ये चर्चांना उधाण
4
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
5
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
6
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
7
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
8
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
9
सॅमसंगची मोठी घोषणा! तुम्ही तुमचा फुटलेला किंवा खराब झालेला फोन वर्षातून दोनदा दुरुस्त करू शकता
10
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
11
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
12
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
13
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
14
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
15
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
16
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
17
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
18
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
19
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
20
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट

सातारा जिल्हा परिषद समाजकल्याण विभागच बनलाय अतिरिक्त, सचिन साळे लाचप्रकरणी निलंबित तर अर्जुन बन्ने जून महिन्यापासून गैरहजर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2017 7:38 PM

सातारा जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागाला पूर्णवेळ अधिकारीच मिळत नाही. २०१२ पासून आजअखेर अपवाद वगळता जिल्हा परिषदेतील इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांकडेच या विभागाचा अतिरिक्त कार्यभार दिला जात आहे. जून महिन्यात दाखल झालेले अर्जुन बन्ने हे जून महिन्यापासून कामावर गैरहजर आहेत. आता महिला व बालकल्याण विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी जावेद शेख यांच्याकडे या विभागाचा अतिरिक्त पदभार देण्यात आलेला आहे.

ठळक मुद्देसचिन साळे लाचप्रकरणी निलंबित अर्जुन बन्ने जून महिन्यापासून गैरहजर

सातारा : जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागाला पूर्णवेळ अधिकारीच मिळत नाही. २०१२ पासून आजअखेर अपवाद वगळता सातारा जिल्हा परिषदेतील इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांकडेच या विभागाचा अतिरिक्त कार्यभार दिला जात आहे. जून महिन्यात दाखल झालेले अर्जुन बन्ने हे जून महिन्यापासून कामावर गैरहजर आहेत. आता महिला व बालकल्याण विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी जावेद शेख यांच्याकडे या विभागाचा अतिरिक्त पदभार देण्यात आलेला आहे.या विभागाला पूर्णवेळ अधिकारीच दिला जात नाही. अतिरिक्त पदभार असणाऱ्या अधिकाऱ्यांवर त्यांच्याकडे असणाऱ्या खात्याचा कारभार बघत हा अतिरिक्त भार सांभाळावा लागतो. साहजिकच संबंधित अधिकाऱ्यांवर ताण येताना दिसतो आहे. शासन नवनवीन संकल्पना राबवित आहे, अनेक योजनांची वेळेत अंमलबजावणी झाली पाहिजे, यासाठीही शासन आग्रही आहे. परंतु पूर्णवेळ अधिकारीच नसेल तर त्या विभागाशी संबंधित असणाऱ्या घटकांवर अन्यायच होताना पाहायला मिळत आहे.

प्रदीर्घ कालावधीनंतर सचिन साळे यांची पूर्णवेळ समाजकल्याण अधिकारी म्हणून नियुक्ती केली गेली होती; पण ते लाचप्रकरणात निलंबित झाले. तर त्यांच्या रिक्त जागेचा पदभार जिल्हा कृषी अधिकारी चांगदेव बागल यांच्याकडे अतिरिक्त पदभार देण्यात आला. जून महिन्यात शासनाने अर्जुन बन्ने यांची या पदावर बदली झाली. मात्र बन्ने जास्त काळ जिल्हा परिषदेत रमलेच नाहीत.

२९ जून २०१७ पासून ते वरिष्ठांना न कळवताच गैरहजर आहेत. याबाबत जिल्हा परिषद प्रशासनाने नोटीस बजावल्यानंतर त्यांनी २७ सप्टेंबर २०१७ रोजी आजारी असल्याने गैरहजर असल्याचा अर्ज सादर केला होता. त्यानंतरही अद्याप ते गैरहजरच आहेत.

मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कैलास शिंदे यांनी महिला व बाल कल्याण विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी जावेद शेख यांच्याकडे पदभार दिला आहे. पण त्यांनाही आपल्या विभागाचे काम सांभाळत या विभागाचे काम पाहावे लागत आहे. साहजिकच त्यांच्यावर कामाचा अतिरिक्त ताण येताना पाहायला मिळतो. त्यातच समाजकल्याण विभागात कर्मचाºयांची संख्याही अपुरी आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरzpजिल्हा परिषद