शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

सातारा जिल्हा परिषदेला पाहिजे सेवानिवृत्तांचा एक तास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2019 00:35 IST

सातारा : खासगी शाळांबरोबर शैक्षणिक स्पर्धेत उतरण्यासाठी जिल्हा परिषद प्रशासन सज्ज झाले आहे. जिल्ह्यातील सेवानिवृत्तांनी या उपक्रमासाठी जिल्हा परिषद ...

ठळक मुद्देशैक्षणिक गुणवत्ता वाढ उपक्रम : तरुणाई अन् महिलांनाही सहभागाचे आवाहन

सातारा : खासगी शाळांबरोबर शैक्षणिक स्पर्धेत उतरण्यासाठी जिल्हा परिषद प्रशासन सज्ज झाले आहे. जिल्ह्यातील सेवानिवृत्तांनी या उपक्रमासाठी जिल्हा परिषद शाळांना एक तास द्यावा, अशी अभिनव कल्पना मांडण्यात आली आहे. विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी तरुणी आणि महिलांनीही हातभार लावण्याची संकल्पना जिल्हा परिषदेने मांडली आहे.

सातारा जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थी मोठ्या प्रमाणावर शिक्षण घेतात. शासनाच्या ध्येय धोरणानुसार जिल्ह्यातील शाळांची वाटचाल सुरू आहे. मात्र, बदलत्या काळातील मूल्यशिक्षणासाह जीवनावश्यक कौशल्य शिकविण्याबरोबरच त्यांना वर्तनशास्त्र शिकविणंही आवश्यक बनलं आहे. जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक आपापल्या परीने हे शिक्षण विद्यार्थ्यांना देत आहेत; पण नियमित अभ्यासक्रम आणि अन्य कामांमुळे त्यांच्यावर अन्य शिक्षणाचा ताण देणं प्रशासनाला कठीण जात आहे.

या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कैलास शिंदे यांनी अभिनव उपक्रम राबविण्याचं ठरविलं आहे. पेन्शनर्स सिटी म्हणून साताऱ्याची ओळख आहे. त्यामुळे येथे विविध विभागातील सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनी आपापल्या परिसरातील शाळांना आठवड्यातून, पंधरवड्यातून किंवा महिन्यातून एक तास वेळ देणं अपेक्षित आहे. या वेळेत त्यांनी जीवन जगण्याचं मूल्य आणि कौशल्य शिकविणं अपेक्षित आहे. सेवानिवृत्तांबरोबरच महिला मंडळे, बिशी गट यांच्यासह जिल्ह्यातील तरुणींनी यासाठी हातभार लावणं आवश्यक आहे. इच्छुकांनी यासाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे अर्ज करणे अपेक्षित आहे.

सहभागीसाठी हे करा!विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी सहभागी होऊ इच्छिणाºया सेवानिवृत्त कर्मचारी, तरुणी आणि महिलांनी जिल्हा परिषदेकडे अर्ज करणे अपेक्षित आहे. या अर्जामध्ये त्यांनी आपली रहिवास पत्त्यासह थोडक्यात माहिती देणं अपेक्षित आहे. याबरोबरच जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना कोणता विषय शिकवणार, यासाठी किती वेळ देऊ शकणार, याविषयी माहिती द्यावी. आपण राहत असलेल्या परिसरातील शाळेची निवड करून त्या शाळेत कला कौशल्यापासून जीवनावश्यक मूल्य रुजवणारे शिक्षण देणं महत्त्वाचं आहे. 

विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढविण्यासाठी आम्ही हा उपक्रम राबवत आहे. ३० मेपर्यंत इच्छुकांचे अर्ज प्राप्त होणे अपेक्षित आहे. त्यानंतर शिक्षण विभागाशी चर्चा करून शाळेच्या तासिकेत हे वर्ग समाविष्ट करण्यात येतील. सामाजिक कार्याची आवड असलेल्यांनी यासाठी पुढे यावे.- डॉ. कैलास शिंदे,मुख्य कार्यकारी अधिकारी, सातारा

टॅग्स :zpजिल्हा परिषदSatara areaसातारा परिसरEducationशिक्षण