शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
2
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
3
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
4
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
5
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
6
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
7
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
8
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
9
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
10
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
11
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
12
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
13
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
14
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?
15
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
16
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
17
जिच्यासाठी माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी आयुष्य संपवलं, ती पूजा गायकवाड कोण?
18
मस्तच! नवरात्रात कन्या पूजनानंतर मुलींना द्या 'ही' यूजफुल गिफ्ट्स; आनंदाने उजळतील चिमुकल्यांचे चेहरे
19
फुलांचा गजरा माळून गेली आणि फसली, ऑस्ट्रेलियात भारतीय अभिनेत्रीवर कारवाई, नेमकं कारण काय?  
20
कतारनंतर आता तुर्कीवर हल्ला करणार इस्रायल? हमासशी आहे थेट कनेक्शन!

ऑनलाइन प्रणालीत सातारा जिल्हा परिषदेचा राज्यात प्रथम क्रमांक, आरोग्य विभाग कर्मचाऱ्यांची १०० टक्के डिजिटल हजेरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2025 16:22 IST

सातारा : सातारा जिल्हा आणि जिल्हा परिषदही नेहमीच शासनाच्या विविध योजना, उपक्रमांत आघाडीवर असते. अशाच प्रकारे आता जिल्हा परिषदेच्या ...

सातारा : सातारा जिल्हा आणि जिल्हा परिषदही नेहमीच शासनाच्या विविध योजना, उपक्रमांत आघाडीवर असते. अशाच प्रकारे आता जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांची १०० टक्के डिजिटल हजेरी सुरू झाली आहे. यामुळे सातारा जिल्हा परिषदेने राज्यात ऑनलाइन प्रणालीत प्रथम क्रमांक मिळवला आहे.सातारा जिल्हा परिषदेचा आरोग्य विभाग विविध योजनांमध्ये नेहमीच अग्रेसर असतो, तसेच शासनाच्याही बहुतांश नवीन योजना, मोहिमेची सुरुवात ही सातारा जिल्ह्यातूनच होत असते. प्रत्येक बाबतीत पुढे असणाऱ्या या जिल्ह्यात आता जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांच्या मार्गदर्शनाखाली आणखी एका बाबतीत साताऱ्याने अत्यंत समाधानकारक अशी कामगिरी केलेली आहे. सार्वजनिक आरोग्य विभाग आयुक्तांच्या ५ मार्च २०२५ च्या आदेशानुसार आरोग्य विभागांतर्गत कार्यरत अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची दैनंदिन हजेरी फेस रीडिंग तसेच बायोमेट्रिक पद्धतीने करण्याची प्रक्रिया ३१ मार्चपर्यंत पूर्ण करायची होती. त्याचबरोबर एप्रिलपासूनचे मासिक वेतन ऑनलाइन दैनंदिन हजेरी अहवालानुसारच अदा करण्याबाबत सूचना होती. त्यानुसार सातारा जिल्ह्यात कर्मचाऱ्यांची दैनंदिन हजेरी नोंद करण्यासाठी ॲप्लिकेशनचा वापर सुरू केला, तसेच याअंतर्गत १ हजार ५१२ नियमित कर्मचारी आणि राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत १ हजार १२० कर्मचाऱ्यांची नोंद प्रणालीत करण्यात आलेली आहे.

यूबीआय ॲपमध्ये ८४ प्राथमिक आरोग्य केंद्रे..‘यूबीआय’ ॲपमध्ये जिल्हास्तरावरील जिल्हा परिषद, प्रशिक्षण केंद्र, जिल्हा रुग्णालय, पंचायत समितीस्तरावरील ११ तालुका आरोग्य अधिकारी कार्यालये, ३ उपजिल्हा रुग्णालये, १५ ग्रामीण रुग्णालये, ८४ प्राथमिक आरोग्य केंद्रे, ४१५ उपकेंद्रे आदी आरोग्य संस्थांचा समावेश आहे.

सातारा जिल्हा नेहमीच विविध योजना, उपक्रमांमध्ये राज्यात नेहमीच अग्रेसर असतो. बहुतांश नवीन पथदर्शी प्रकल्पांची सातारा जिल्ह्यातूनच सुरुवात होत असते. आता सातारा जिल्हा परिषदेचा आरोग्य विभाग ऑनलाइन हजेरी प्रणालीचा यशस्वी अंमलबजावणी करणारा राज्यातील पहिला जिल्हा ठरला आहे. ही मोठी कामगिरी ठरलेली आहे. - याशनी नागराजन, मुख्य कार्यकारी अधिकारी 

टॅग्स :Satara areaसातारा परिसरzpजिल्हा परिषदdigitalडिजिटलGovernmentसरकार