शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

सातारा : लग्न ठरत नसल्याचे युवकाची आत्महत्या, वाई तालुक्यातील बदेवाडी येथील घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2018 12:36 IST

लग्न ठरत नसल्याने आलेल्या नैराश्येतून वाई तालुक्यातील बदेवाडी येथील एका युवकाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. नितीन नामदेव शेंडगे (वय २८) असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे. ही घटना गुरुवारी रात्री साडे अकरा वाजण्याच्या सुमारास घडली.

ठळक मुद्देलग्न ठरत नसल्याचे युवकाची आत्महत्यावाई तालुक्यातील बदेवाडी येथील घटनाघरातील लोखंडी अ‍ॅँगलला घेतला गळफास

पाचवड : लग्न ठरत नसल्याने आलेल्या नैराश्येतून वाई तालुक्यातील बदेवाडी येथील एका युवकाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. नितीन नामदेव शेंडगे (वय २८) असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे. ही घटना गुरुवारी रात्री साडे अकरा वाजण्याच्या सुमारास घडली.याबाबत भुर्इंज पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, नितीन शेंडगे हा कामकाजानिमित्त दि. १ रोजी भुर्इंज येथे आला होता. गुरुवारी रात्री तो बदेवाडी येथे आला. विमल देठे यांच्या घरी जेवण केल्यानंतर नितीन रात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास झोपण्यासाठी निघून गेला. झोपण्यापूर्वी त्याने घराचा दरवाजा आतून बंद केला.रात्री बराच वेळ दरवाजा न उघडल्याने नितीनचे वडील नामदेव शेंडगे यांनी याबाबतची माहिती जावई बाळासाहेब कांबळे यांना दिली. यानंतर कांबळे यांनी दरवाजा उघडला असता, नितीनने लोखंडी अ‍ॅँगलला ओढणीच्या साह्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे उघडकीस आले.

दरम्यान, नितीनचे लग्न ठरत नसल्याने तो नैराश्येखाली वावरत होता. याच कारणातून त्याने आत्महत्या केल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. नामदेव शेंडगे यांनी भुर्इंज पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून, पोलीस तपास करीत आहेत. 

टॅग्स :Satara areaसातारा परिसरCrimeगुन्हा