सातारा : वॉटर कप स्पर्धा : राज्यातील ४९०० गावांत तुफान येणार...४५ तालुके अन् २४ जिल्हे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 2, 2018 01:07 PM2018-04-02T13:07:34+5:302018-04-02T13:07:34+5:30

वॉटर कप स्पर्धेच्या तिसऱ्या टप्प्याला आठ एप्रिलपासून सुरुवात होत असून, राज्यातील सुमारे ४९०० गावांत तुफान येणार आहे. यावर्षी गावांचा सहभाग मोठ्या प्रमाणात वाढला असून, राज्यातील २४ जिल्ह्यातील ४५ तालुके स्पर्धेत सहभागी झाले आहेत.

Satara: Water Cup Competition: There will be a tornado in 4900 villages ... 45 talukas and 24 districts | सातारा : वॉटर कप स्पर्धा : राज्यातील ४९०० गावांत तुफान येणार...४५ तालुके अन् २४ जिल्हे

सातारा : वॉटर कप स्पर्धा : राज्यातील ४९०० गावांत तुफान येणार...४५ तालुके अन् २४ जिल्हे

Next
ठळक मुद्देवॉटर कप : राज्यातील ४९०० गावांत तुफान येणार...४५ तालुके अन् २४ जिल्हे स्पर्धेत सहभागी  वॉटर कप स्पर्धेमध्ये यावर्षी सहभाग वाढला; साताऱ्यातील १६३ गावांचा सहभाग

सातारा : वॉटर कप स्पर्धेच्या तिसऱ्या टप्प्याला आठ एप्रिलपासून सुरुवात होत असून, राज्यातील सुमारे ४९०० गावांत तुफान येणार आहे. यावर्षी गावांचा सहभाग मोठ्या प्रमाणात वाढला असून, राज्यातील २४ जिल्ह्यातील ४५ तालुके स्पर्धेत सहभागी झाले आहेत.

तीन वर्षांपासून राज्यात अभिनेता अमीर खान यांच्या पाणी फाउंडेशनच्या वतीने वॉटर कप स्पर्धा सुरू झाली आहे. पहिल्यावर्षी या स्पर्धेला फारसा प्रतिसाद मिळाला नाही. सातारा, बीड आणि अमरावती हे तीन जिल्हे या स्पर्धेत सहभागी झाले होते.

यामध्ये सातारा जिल्ह्यानेच अंतिम बाजी मारत प्रथम क्रमांक मिळविला होता. कोरेगाव तालुक्यातील वेळू गावाने हा क्रमांक पटकावला होता. दुसऱ्या स्पर्धेसाठी राज्यातील १३ जिल्हे उतरले होते. तर ३०
तालुक्यांतील सुमारे १२०० हून अधिक गावांनी या स्पर्धेत सहभाग घेतला होता.

सातारा जिल्ह्याने दुसऱ्या वर्षीही मोठ्या प्रमाणात व सक्रिय असा सहभाग नोंदवला. जिल्ह्यातील ९६ गावे या स्पर्धेत उतरली होती. त्यामध्ये अधिक करून माण तालुक्यातील ३२ गावांचा सहभाग होता.

जवळपास या सर्वच गावांमध्ये जलसंधारणाचे मोठे काम झाले आहे. यामध्ये डीपसीसीटी, ओढ्याचे रुंदीकरण व खोलीकरण, सीसीटी, वृक्षारोपणासाठी खड्डे, विहीर पुनर्भरण, माती परीक्षण, बंधारे, पाझर तलाव दुरुस्ती, गळती काढणे, नवीन नालाबांध तयार करणे आदी कामांचा समावेश होता.

वॉटर कप स्पर्धेचा तिसरा टप्पा दि. ८ एप्रिलपासून सुरू होत आहे. हे काम ४५ दिवस चालणार असून, दि. २२ मे रोजी स्पर्धा संपणार आहे. यावर्षी स्पर्धेत राज्यातील २४ जिल्ह्यातील ४५ तालुके उतरले आहेत. यामध्ये ४९०० गावांचा समावेश आहे.

सातारा जिल्ह्यातही यावर्षी गतवर्षीप्रमाणेच माण, खटाव आणि कोरेगाव हे तालुके आहेत; पण यावर्षी स्पर्धेतील गावांची संख्या वाढली असून, ती १६३ इतकी झाली आहे. त्यामध्ये माण तालुका ६६, खटाव ५७ आणि
कोरेगाव तालुक्यातील ४० गावांचा समावेश आहे.


सध्या वॉटर कपमध्ये सहभागी झालेल्या गावांत जनजागृती, ग्रामसभा घेण्याचे काम सुरू आहे. पाणी फाउंडेशनचे पदाधिकारी व ग्रामस्थ शिवारफेरी करीत आहेत. त्यातून कामाचे नियोजन करण्यात येत आहे.
 

Web Title: Satara: Water Cup Competition: There will be a tornado in 4900 villages ... 45 talukas and 24 districts

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.