शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

सातारा : वानरांच्या टोळीला ग्रामस्थांनीच केले जेरबंद, किवळमधील घटना : वनविभागावर संताप; नुकसान केल्याने पन्नासहून जास्त वानरे पिंजऱ्यात कोंडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2018 17:19 IST

किवळ, ता. कऱ्हाड परिसरात वानरांनी धुमाकूळ घालत शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान केले आहे. वनविभागाला वारंवार सांगूनही त्यांच्याकडून या वानर टोळीचा बंदोबस्त झाला नाही. अखेर संतापलेल्या शेतकऱ्यांनीच शुक्रवारी या वानरांना जेरबंद केले. पन्नासहून जास्त वानरे पकडून त्यांना पिंजऱ्यांत कोंडले.

ठळक मुद्देवानरांच्या टोळीला ग्रामस्थांनीच केले जेरबंदकिवळमधील घटना : वनविभागावर संताप; नुकसान केल्याने पन्नासहून जास्त वानरे पिंजऱ्यांत कोंडली

मसूर : किवळ, ता. कऱ्हाड परिसरात वानरांनी धुमाकूळ घालत शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान केले आहे. वनविभागाला वारंवार सांगूनही त्यांच्याकडून या वानर टोळीचा बंदोबस्त झाला नाही. अखेर संतापलेल्या शेतकऱ्यांनीच शुक्रवारी या वानरांना जेरबंद केले. पन्नासहून जास्त वानरे पकडून त्यांना पिंजऱ्यांत कोंडले.दरम्यान, या घटनेची माहिती मिळाल्यानंतर गावात पोहोचलेल्या वन विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना ग्रामस्थांनी चांगलेच फैलावर घेतले. यापूर्वी अनेकवेळा सांगूनही कोणीही गावाकडे फिरकले नाही. मग आज कशाला आलात, असे म्हणून अधिकाऱ्यांची चांगलीच झाडाझडती घेतली. त्यामुळे काहीकाळ तणाव निर्माण झाला होता.किवळ परिसरात धुमाकूळ घालणाऱ्या वानरांचा बंदोबस्त करण्याची मागणी शेतकरी व ग्रामस्थांनी वन विभागाकडे केली होती. मात्र, वनविभागाने याबाबत कोणतीही कारवाई केली नाही. त्यामुळे संतप्त झालेले किवळचे ग्रामस्थ शुक्रवारी सकाळी एकवटले. त्यांनी लोखंडी पिंजरा आणून त्यामध्ये वानरांना कोंडण्याचा प्रयत्न सुरू केला.

वेगवेगळ्या ठिकाणावरून हुसकावून अनेक वानरे त्यांनी एकाच जागेवर आणली. त्याठिकाणी ठेवलेल्या पिंजऱ्यांत त्यांना कोंडण्यात आले. यावेळी मोठा गोंधळ उडाला होता. वानरांचा पाठलाग करणारे ग्रामस्थ आरडाओरडा करीत त्यांना हुसकावण्याचा प्रयत्न करीत होते. तर ग्रामस्थांना हुल देत वानरसेना झाडांवर उड्या घेत होती. अखेर पन्नासपेक्षा जास्त वानरांना ग्रामस्थांनी पिंजऱ्यांमध्ये कोंडले.

 

किवळ, ता. कऱ्हाड येथील ग्रामस्थांनी शुक्रवारी पन्नासपेक्षा जास्त वानरे पकडून त्यांना पिंजऱ्यात कोंडले. (छाया : जगन्नाथ कुंभार) 

टॅग्स :Satara areaसातारा परिसरFarmerशेतकरीMonkeyमाकड