शहरं
Join us  
Trending Stories
1
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
2
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
3
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
4
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
5
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
6
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
7
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
8
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
9
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
10
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
11
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
12
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
13
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
14
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
15
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
16
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
17
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
18
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
19
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
20
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...

सातारा : भाजी विक्रेत्या झाल्या रणचंडिका, राजवाडा परिसरातील प्रकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2018 16:10 IST

प्रतापसिंह भाजी मंडईत महिला विक्रेत्यांच्या चेहऱ्यावर लाईट मारणाऱ्या माथेफिरूला येथील महिलांनी चांगलीच अद्दल घडवून त्याला पोलिसांच्या ताब्यात दिले. हा प्रकार मंगळवारी रात्री नऊच्या सुमारास घडला.

ठळक मुद्देभाजी विक्रेत्या झाल्या रणचंडिका, राजवाडा परिसरातील प्रकार रात्रीच्या वेळी तोंडावर लाईट मारून काढत होता छेड

सातारा : प्रतापसिंह भाजी मंडईत महिला विक्रेत्यांच्या चेहऱ्यावर लाईट मारणाऱ्या माथेफिरूला येथील महिलांनी चांगलीच अद्दल घडवून त्याला पोलिसांच्या ताब्यात दिले. हा प्रकार मंगळवारी रात्री नऊच्या सुमारास घडला.राजवाडा परिसरात असलेल्या प्रतापसिंह भाजी मंडईत महिला विक्रेत्यांची संख्या लक्षणीय आहे. संध्याकाळी पाचनंतर मंडईत गर्दी वाढते, त्यामुळे घरातील महिलाही येथे भाजी विक्रीसाठी बसतात.

महिलांसाठी सुरक्षित असलेल्या मंडईत शुक्रवारपासून अज्ञात व्यक्ती लेझर आणि लाईट मारत असल्याचे विक्रेत्यांच्या निदर्शनास येत होते. मात्र, दुकानापुढे विक्रेत्यांची गर्दी वाढती असल्यामुळे या प्रकाराकडे त्यांनी दुर्लक्ष केले.

सलग तीन दिवस होऊनही हा प्रकार थांबेना म्हटल्यावर मंगळवारी विक्रेत्यांनी ठरवून संबंधिताचा शोध घेण्याचं ठरविलं. मंगळवारीही रात्री सातच्या सुमारास पुन्हा लाईट मारण्याचा प्रकार सुरूच होता. त्यामुळे संतापलेल्या महिला भाजी विक्रेत्यांनी संबंधितांना अद्दल घडविण्याचं ठरविलं.

मंडईतील गर्दी आटोक्यात आल्यानंतर परस्परांना खुणावून या महिला एकेक करून मंडईच्या बाहेर पडल्या, त्यांच्यासमवेत काही तरुणही गेले. मंडईशेजारी असणाऱ्या प्रतापसिंह वाड्यात अंदाजाने हे विक्रेते पोहोचले.वाड्याच्या दुसऱ्या मजल्यावर त्यांना बोलणे ऐकू आले. त्या दिशेने त्या दुसऱ्या मजल्यावर पोहोचल्या तर तिथे मद्यधुंद अवस्थेत तीन युवक बसल्याचे त्यांना दिसले. यातील एका युवकाच्या हातात बॅटरी सुरू असलेला मोबाईल आढळला.राजवाड्याच्या मजल्यावर एकदम आलेल्या विक्रेत्यांना पाहून दोघा मद्यपींनी तिथून उड्या मारून पळ काढला. तर एकजण विक्रेत्यांच्या तावडीत सापडला. संतप्त झालेल्या महिला विके्रत्यांनी त्याला बेदाम चोप देत रस्त्यावर आणला.

युवक सापडल्या सापडल्या काही विक्रेत्यांनी पोलिसांत कळविले. त्यामुळे लगेचच पोलिसांच्या गाडीतून त्या युवकाची पोलीस ठाण्यात रवानगी करण्यात आली. दरम्यान, मंडईतील महिला भाजी विक्रेत्यांच्या या धाडसाचे कौतुक परिसरातील नागरिकांसह पोलिसांनीही केले.एक सोडून बाकी सगळ्या मोहिमेवर..चार दिवसांपासून सुरू असलेला हा त्रास असह्य झाल्याने संबंधिताला अद्दल घडविण्याची मोहीम सोमवारी रात्रीच निश्चित झाली होती. ज्या महिलांच्या चेहऱ्यावर लाईट पाडली जाते, त्यातील एका महिलेला मंडईत ठेवून बाकीच्या महिला त्याच्या शोधार्थ बाहेर पडल्या. सगळ्याच महिला बाहेर पडल्या असत्या तर संबंधित माथेफिरू सावध झाला असता, ही त्यामागची योजना होती.

टॅग्स :vegetableभाज्याSatara areaसातारा परिसरMarketबाजार