Satara: घरपट्टीबाबत उदयनराजेंनी भूमिका स्पष्ट करावी, शिवेंद्रसिंहराजे यांनी दिलं आव्हान

By सचिन काकडे | Published: October 13, 2023 03:05 PM2023-10-13T15:05:34+5:302023-10-13T15:07:12+5:30

Satara News: सातारा विकास आघाडी व त्यांच्या नेत्यांनी घरपट्टीबाबत काय निर्णय घेणार आहात, हे स्पष्ट करावं,’ असे आव्हान आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी खासदार उदयनराजे भोसले यांना दिले.

Satara: Udayan Raje should clarify his position regarding Gharpatti, Shivendrasinhraje challenged | Satara: घरपट्टीबाबत उदयनराजेंनी भूमिका स्पष्ट करावी, शिवेंद्रसिंहराजे यांनी दिलं आव्हान

Satara: घरपट्टीबाबत उदयनराजेंनी भूमिका स्पष्ट करावी, शिवेंद्रसिंहराजे यांनी दिलं आव्हान

- सचिन काकडे
सातारा - ‘सातारा शहरात घरपट्टीबाबत सध्या मोठा गोंधळ सुरू असून, नागरिकांवर अन्याय केला जात आहे. असे असताना ज्यांनी पाच वर्षे सत्ता भोगली ती मंडळी आज कुठे गायब झाली आहे? सातारा विकास आघाडी व त्यांच्या नेत्यांनी घरपट्टीबाबत काय निर्णय घेणार आहात, हे स्पष्ट करावं,’ असे आव्हान आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी खासदार उदयनराजे भोसले यांना दिले.

हद्दवाढ भागातील घरपट्टीबाबत शुक्रवारी आ. शिवेंद्रसिंहराजे यांच्यासह शाहूनगर, विलासपूर, पिरवाडी, शाहूपुरी या भागातील नागरिकांनी मुख्याधिकारी अभिजित बापट यांची भेट घेऊन त्यांना मागण्यांचे निवेदन दिले. यानंतर आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, ‘सातारा पालिकेने हद्दवाढ भागातील मिळकतींना चुकीच्या पद्धतीने घरपट्टीची बिले दिली आहेत. मात्र, पालिकेत पाच वर्षे सत्ता उपभोगलेल्या सत्ताधाऱ्यांना याचे काही देणे-घेणे नाही. जनतेवर अन्याय होत असताना ही मंडळी आज कुठे गायब झाली आहे? सत्ता मिळवायची आणि पैसे खायचे हा त्यांचा डाव नागरिकांनी ओळखायला हवा. सत्ताधाऱ्यांनी पालिका व नागरिकांना वाऱ्यावर सोडण्याचे काम करु नये. पुढे त्यांनाही निवडणूक लढवायची आहे.

राज्य शासनाने हद्दवाढ भागातील विकासकामांसाठी ४८ कोटींचा निधी मंजूर केला होता. या निधीतून रस्ते व अन्य विकासकामे दर्जेदारच व्हायला हवीत. कामे चांगली होत नसतील तर अधिकाऱ्यांनी ठेकेदारांची बिले काढू नये. जर बिले काढलीच तर आगामी अधिवेशनात याबाबत आवाज उठवून दोषी अधिकाऱ्यांना निलंबित करण्यासही मागे-पुढे पाहणार नाही.

घरपट्टीच्या बिलांबाबत योग्य ती कार्यवाही केली जाईल, प्रत्येक भागात अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून शिबिर घेऊन नागरिकांच्या तक्रारी दूर केल्या जातील, असे आश्वासन मुख्याधिकारी यांनी दिले आहे. याबाबत प्रशासनाने तातडीने कार्यवाही करावी, आमच्या सहनशीलतेचा अंत पाहू नये, असा इशाराही यावेळी आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी दिला. यावेळी माजी उपनगराध्यक्ष अविनाश कदम, अमोल मोहीते, धनंजय जांभळे, विजय काटवटे, अशोक मोने, शेखर मोरे-पाटील यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Web Title: Satara: Udayan Raje should clarify his position regarding Gharpatti, Shivendrasinhraje challenged

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.