शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

सातारा : उदयनराजेंच्या सोहळ्याला राष्ट्रवादी आमदारांची दांडी, मुख्यमंत्र्यांच्या स्वागतात उदयनराजे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2018 17:55 IST

खासदार उदयनराजे भोसले यांच्या सत्कार सोहळ्यासाठी मुख्यमंत्री फडणवीस अन् राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार साताऱ्यांत आले असले तरी जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या आमदारांनी मात्र या सोहळ्यास न जाण्याचा निर्णय घेऊन साताऱ्याच्या राजकारणाला कलाटणी दिली आहे.

ठळक मुद्देमुख्यमंत्र्यांच्या स्वागतात उदयनराजे राष्ट्रवादी आमदार मात्र पवारांसोबत चर्चेत!

सातारा : खासदार उदयनराजे भोसले यांच्या सत्कार सोहळ्यासाठी मुख्यमंत्री फडणवीस अन् राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार साताऱ्यांत आले असले तरी जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या आमदारांनी मात्र या सोहळ्यास न जाण्याचा निर्णय घेऊन साताऱ्याच्या राजकारणाला कलाटणी दिली आहे.

विशेष म्हणजे शरद पवार जेव्हा आपल्या पक्षाच्या आमदारांशी चर्चा करण्यात गुंतलेले होते. याचवेळी दुसरीकडे उदयनराजे हे भाजपचे मंत्री चंद्रकांतदादा पाटील अन् शिवसेनेचे पालकमंत्री विजय बापू शिवतारे यांच्यासोबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या स्वागतासाठी हेलीपॅडवर थांबले होते.

बारामतीतून निघालेले शरद पवार साताऱ्यात आल्यानंतर माजी आमदार प्रभाकर घार्गे यांच्या प्रीती हॉटेलमध्ये दाखल झाले. पावणे तीन वाजता राष्ट्रवादीच्या मोजक्या मंडळींनी त्यांचे स्वागत केले.

यावेळी विधान परिषद सभापती रामराजे नाईक-निंबाळकर, आमदार शशिकांत शिंदे, आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, आमदार मकरंद पाटील यांच्यासह पक्षातील इतर स्थानिक नेते उपस्थित होते. शरद पवार उदयनराजेंच्या सोहळ्यास उपस्थित राहणार का, अशी चर्चा दिवसभर राहिल्याने या बैठकीकडे बाहेरील कार्यकर्त्यांचे लक्ष लागून राहिले होते.दरम्यान, ही बैठक सुरू असतानाच उदयनराजे अकस्मातपणे याठिकाणी आले. पवार यांचे स्वागत करून ते पुन्हा निघून गेले. त्यानंतर इतर आमदारांची पवारांशी पुन्हा चर्चा सुरू झाली. यानंतर उदयनराजे मुख्यमंत्री फडणवीस यांचे स्वागत करण्यासाठी हेलीपॅडवर प्रतीक्षा करू लागले.

यावेळी त्यांच्यासोबत सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांतदादा पाटील अन् साताऱ्याचे पालकमंत्री विजय बापू शिवतारे हे होते. मुख्यमंत्री आल्यानंतर त्यांचे स्वागत करून उदयनराजे पुन्हा पवारांच्या बैठकीत आले. राजेंशी चर्चा झाल्यानंतर शरद पवारही बैठकीतून उठले. त्यानंतर त्यांची गाडी कार्यक्रमस्थळाकडे रवाना झाल्यामुळे पवारांच्या अनुपस्थितीची चर्चा संपली.

टॅग्स :Udayanraje Bhosaleउदयनराजे भोसलेSatara areaसातारा परिसरSharad Pawarशरद पवार