साताऱ्यात दोन मटकाबहाद्दर तडीपार

By Admin | Updated: February 27, 2016 00:46 IST2016-02-27T00:45:14+5:302016-02-27T00:46:59+5:30

अभिनव देशमुख यांची कारवाई

In Satara, two shops were closed | साताऱ्यात दोन मटकाबहाद्दर तडीपार

साताऱ्यात दोन मटकाबहाद्दर तडीपार

सातारा : समाजकंटकांना तडीपार करण्याचा पोलिसांचा धडाका सुरूच असून, सातारा आणि मेढा हद्दीत बेकायदा मटका चालविणाऱ्या टोळीप्रमुखासह दोघांना जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी जिल्ह्यातून एक वर्षासाठी तडीपार केले आहे.
जब्बार जमाल पठाण (वय ३८) आणि जैनुद्दीन जमाल पठाण (४५) अशी तडीपार करण्यात आलेल्यांची नावे असून, जब्बार हा टोळीप्रमुख आहे. सातारा शहर, तालुका आणि जावळी तालुक्यात ही टोळी बेकायदा मटका चालवीत होती. त्यांच्यावर वेळोवेळी गुन्हे दाखल झाले असून, प्रतिबंधात्मक कारवाई करून अनेकदा त्यांना सुधारण्याची संधी देण्यात आली होती. तथापि, त्यांच्या वर्तनात सुधारणा झाली नव्हती आणि सर्वसामान्यांना उपद्रव होऊन त्यांच्यावर कडक कारवाईची मागणी लोकांमधून होत होती.
त्यांच्याकडून जिल्ह्याच्या हद्दीत हिंसक घटना घडून भीती व दहशतीचे वातावरण निर्माण होऊ नये म्हणून टोळीतील दोघांना हद्दपार करण्याचा प्रस्ताव डॉ. अभिनव देशमुख यांच्याकडे सादर करण्यात आला होता. या प्रस्तावाची सुनावणी होऊन डॉ. देशमुख यांनी शुक्रवारी (दि. २६) या दोघांना तडीपार करण्याचा आदेश दिला. तडीपारीचा अवधी एक वर्ष असून, या कालावधीत त्यांना जिल्हा हद्दीत प्रवेश करता येणार नाही. आदेशाची अंमलबजावणी झाल्यानंतर ४८ तासांत दोघांना जिल्हा सोडण्यास सांगण्यात आले.
 

Web Title: In Satara, two shops were closed