शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

सातारा : प्रवासात सापडलेले बारा तोळे सोने केले परत, लिंब येथील दाम्पत्याचा प्रामाणिकपणा; पोलिसांनी केले कौतुक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2018 15:26 IST

एसटी प्रवासामध्ये नजरचुकीने प्रत्यक्ष हाती आलेले सुमारे चार लाखांची किंमत असलेले १२ तोळे सोन्यांचे दागिने प्रवासी दाम्पत्यास परत करून लिंब येथील एका दाम्पत्याने आम्ही सातारकर प्रामाणिक आणि सुसंस्कृत असल्याचे सर्वोत्तम उदाहरण दाखवून दिले आहे.

ठळक मुद्दे प्रवासात सापडलेले बारा तोळे सोने केले परतलिंब येथील दाम्पत्याचा प्रामाणिकपणापोलिसांनी केले कौतुक

गोडोली (सातारा) : एसटी प्रवासामध्ये नजरचुकीने प्रत्यक्ष हाती आलेले सुमारे चार लाखांची किंमत असलेले १२ तोळे सोन्यांचे दागिने प्रवासी दाम्पत्यास परत करून लिंब येथील एका दाम्पत्याने आम्ही सातारकर प्रामाणिक आणि सुसंस्कृत असल्याचे सर्वोत्तम उदाहरण दाखवून दिले आहे.बसस्थानक पोलिस चौकीतून मिळालेल्या माहितीनुसार, सुरेश केशव गोरे (रा. दिघी पुणे) हे आपल्या कुटुंबाच्या भेटीसाठी पुण्याहून चिपळूणला गेले होते. त्यानंतर ते चिपळूणहून रत्नागिरी-सातारा या बसने परतीचा प्रवास करत असताना सातारा शहर बसस्थानकात उतरल्यानंतर बारा तोळे सोने व काही रोख रक्कम असलेली आपली बॅग नसल्याचे त्यांच्या लक्षात आले.

बसमध्ये शोधाशोध केल्यानंतर त्यांना एक बॅग मिळाली; मात्र ती त्यांची नव्हती. त्यामुळे चोरीच्या संशयाने त्यांनी बसस्थानक पोलिस चौकी गाठली. घडलेला प्रकार सांगून तक्रार घेण्यास विनंती केली.

इतक्यात दिनकर पांडुरंग सावंत (रा. लिंब ता. सातारा) हे आपल्या पत्नीसमवेत बसस्थानक पोलिस चौकीत आले व त्यांनी पोलिस हवालदार दत्ता पवार, प्रवीण पवार यांना बसमध्ये प्रवास करून पोवई नाक्यावर उतरताना घाई गडबडीत नजरचुकीने आपण ही बॅग घेऊन गेल्याचे सांगत पोलिसांच्या समक्ष बॅगमधील साहित्याची खात्री पटून सावंत यांनी गोरे यांची बॅग प्रामाणिकपणे परत केली.दिनकर सावंत व त्यांच्या पत्नीने दाखविलेल्या या प्रामाणिकपणाबद्दल गोरे दाम्पत्याचे डोळे तर भरून आलेच; पण उपस्थितांमध्येही दिनकर सावंत यांच्या प्रामाणिकपणाची चर्चा सुरू होती.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरPoliceपोलिस