साता-यात ट्रॅक्टरवाल्यांचे गाव !

By Admin | Updated: June 8, 2015 01:16 IST2015-06-08T01:16:17+5:302015-06-08T01:16:17+5:30

अहमदनगर जिल्ह्यातील शेतीची कामे उरकून सातारा जिल्ह्यातील मिरडे येथील ट्रॅक्टर चालकांनी मान्सूनची चाहुल लागताच घराकडे कूच केली आहे. ट्रॅक्टरवाल्यांचे गाव म्हणून मिरडे आता परिचित झाले आहे.

Satara - the tractor-wise village! | साता-यात ट्रॅक्टरवाल्यांचे गाव !

साता-यात ट्रॅक्टरवाल्यांचे गाव !


बाळासाहेब काकडे, श्रीगोंदा
अहमदनगर जिल्ह्यातील शेतीची कामे उरकून सातारा जिल्ह्यातील मिरडे येथील ट्रॅक्टर चालकांनी मान्सूनची चाहुल लागताच घराकडे कूच केली आहे. ट्रॅक्टरवाल्यांचे गाव म्हणून मिरडे आता परिचित झाले आहे.
अहमदनगर आणि बीड जिल्ह्यात यंदाच्या हंगामात मिरडेतून मोठ्या प्रमाणावर ट्रॅक्टरचालक व्यवसायासाठी आले होते. सातारा जिल्ह्यात फलटण तालुक्यात ३ हजार लोकसंख्या असलेले मिरडे हे दुष्काळी गाव आहे. गावात सुमारे ७५० ट्रॅक्टर
आहेत. येथील शेतकऱ्यांनी व्यवसायासाठी बँका, वित्तीय कंपन्यांच्या अर्थसहाय्यातून ट्रॅक्टर खरेदी केले आहेत. ट्रॅक्टरच्या व्यवसायावर गावाची अर्थव्यवस्था आहे.
मिरडेतील ७५० ट्रॅक्टर चालक दिवाळीचा दिवा पाहिला की, नगर, नाशिक, धुळे, नंदूरबार, जळगाव, बीड, उस्मानाबाद या जिल्ह्यात शेतीची कामे करण्यासाठी समूहाने बाहेर पडतात. साधारणपणे ५ ते १० ट्रॅक्टर चालक एका गावात थांबतात आणि समूह पद्धतीने शेताचे मशागतीचे काम करतात. शेतकऱ्यांसाठी चर्चेचा विषय ठरु लागली आहे.

सहा महिन्यांत बारा कोटींची उलाढाल
सहा महिन्यांच्या कालखंडात एक ट्रॅक्टर चालक सुमारे ३ लाखांचा व्यवसाय करतो. नगर जिल्ह्यात त्यांनी सुमारे १२ कोटींचे उत्पन्न मिळविले.

Web Title: Satara - the tractor-wise village!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.