शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

Satara: कराडच्या माजी नगराध्यक्षांनी घेतली हातात 'तुतारी'! शशिकांत शिंदेंनी घेतली भेट

By प्रमोद सुकरे | Updated: April 21, 2024 10:18 IST

Maharashtra Lok Sabha Election 2024: कराडचे माजी नगराध्यक्ष व भाजपचे नेते डॉ. अतुल भोसले यांचे निकटवर्तीय असणाऱ्या जयवंतराव पाटील यांनी चक्क महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा प्रचार करण्याचा निर्णय घेतला आहे.

- प्रमोद सुकरेसातारा - कराड तालुका हा राजकीय दृष्ट्या संवेदनशील म्हणून ओळखला जातो. दिवंगत यशवंतराव चव्हाण यांच्या या कर्मभूमीतील घडामोडींकडे नेहमीच सर्वांचे लक्ष लागून राहिलेले असते. आता लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरही कराड शहर व तालुक्यात घडामोडी सुरू झाल्या आहेत. त्यातील एक महत्त्वाची घडामोडी म्हणजे कराडचे माजी नगराध्यक्ष व भाजपचे नेते डॉ. अतुल भोसले यांचे निकटवर्तीय असणाऱ्या जयवंतराव पाटील यांनी चक्क महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा प्रचार करण्याचा निर्णय घेतला आहे. शुक्रवारी त्यांनी  शहरात शशिकांत शिंदे यांच्या पाठिंबाचे लावलेले फ्लेक्स लोकांच्या नजरेला पडले आणि राजकीय वर्तुळात त्याच्या चर्चा रंगल्या आहेत.

कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघात शहरातील मतदारांची भूमिकाही नेहमीच महत्त्वपूर्ण ठरत आली आहे. कराड शहरात सुमारे ६५ हजारावर मतदार आहेत. त्यामुळे शहरातील नेते, प्रमुख कार्यकर्ते काय भूमिका घेतात हे महत्त्वाचे ठरत असते.

सातारा लोकसभा मतदारसंघात महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा सामना रंगणार आहे. महायुतीकडून खासदार उदयनराजे भोसले तर महाविकास आघाडीकडून आमदार शशिकांत शिंदे यांनी शक्तीप्रदर्शनाने अर्ज दाखल केले आहेत.आता दोघांनीही पायाला भिंगरी बांधली असून मतदारांच्या गाठीभेटीवर भर दिला आहे. तेथून त्यांना प्रतिसादही मिळत आहे.

पण कराडचे माजी नगराध्यक्ष जयवंतराव पाटील यांनी त्यांच्याकडे उमेदवार शशिकांत शिंदे भेटीला येण्यापूर्वीच आपली भूमिका जाहीर केली आहे. त्यांनी शशिकांत शिंदे यांना पाठिंबा देणारे लावलेले फ्लेक्स राजकीय वर्तुळात चर्चेचे ठरले आहेत. डॉ. अतुल भोसले यांचे निकटवर्ती असणाऱ्या जयवंतराव पाटलांनी 'तुतारी' कशी काय हातात घेतली याची चर्चा आता जोरदार सुरू आहे.

महाविकास आघाडीचे उमेदवार शशिकांत शिंदे शुक्रवारी दुपारी कराड दौऱ्यावर आले होते. त्यावेळी त्यांनी माजी नगराध्यक्ष जयवंतराव पाटील यांच्या निवासस्थानी आवर्जून भेट दिली. जिल्ह्यात पहिल्यांदा तुम्ही न मागता मला पाठिंबा देण्याची भूमिका घेतली त्याबद्दल त्यांनी त्यांचे आभार मानले. यावेळी कराड उत्तरचे आमदार, माजी मंत्री बाळासाहेब पाटील, कराडचे माजी उपनगराध्यक्ष सुभाष डुबल व शहरातील अनेक माजी नगरसेवक उपस्थित होते. त्यानंतर शशिकांत शिंदे यांनी जनशक्ती आघाडीचे अध्यक्ष अरुण जाधव यांच्या निवासस्थानीही सदिच्छा भेट दिली.यावेळी माजी नगराध्यक्षा शारदा जाधव व अनेक माजी नगरसेवक उपस्थित होते.

टॅग्स :maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४satara-pcसाताराlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४Shashikant Shindeशशिकांत शिंदे