यशात सातारा तालुक्याचा मोठा वाटा

By Admin | Updated: October 23, 2014 00:08 IST2014-10-22T21:06:01+5:302014-10-23T00:08:19+5:30

खटावमध्ये काँग्रेसमय : कोरेगाव दुसऱ्या स्थानावर तर खटावला तिसरा क्रमांक

Satara taluka has a big share in the success | यशात सातारा तालुक्याचा मोठा वाटा

यशात सातारा तालुक्याचा मोठा वाटा

कोरेगाव : ‘मी बाहेरचा नाही, तर माझ्या जुन्या जावळी मतदारसंघातील १८ गावे ही कोरेगाव मतदारसंघात आल्याने मी स्थानिकच आहे. या गावांचा माझा जुना ऋणानुबंध आहे, असे खुलेपणाने सांगत काँग्रेसला आव्हान देणाऱ्या आमदार शशिकांत शिंदे यांना या गावांनी सलग चौथ्यांदा म्हणजेच २०१४ च्या सार्वत्रिक निवडणुकीत भरभरून मते दिली आहेत. मतदारसंघामध्ये सातारा, कोरेगाव आणि खटाव तालुक्यांचा समावेश होतो, या तालुक्यांपैकी सातारा तालुक्याने पुन्हा एकदा बाजी मारत आपला प्रथम क्रमांक राखला.
निवडणूक ऐन रंगात आल्यावर काँग्रेसने वातावरणनिर्मितीसाठी कोरेगावात स्टार प्रचारक असलेल्या माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची जाहीर सभा आयोजित केली होती. या सभेत चव्हाण यांनी माजी मंत्री शशिकांत शिंंदे यांचे थेट नाव न घेता, बाहेरच्यांचा पाहुणचार पुरा झाला, त्यांना आता जाऊ द्या, असे म्हणत टीका केली होती. ज्या ठिकाणी काँग्रेसची सभा झाली, त्याच बाजार मैदानावर दुसऱ्या दिवशीच शशिकांत शिंंदे यांनी सभा घेत माजी मुख्यमंत्र्यांना प्रत्त्युतर दिले होते. मी तर जिल्ह्यातला भूमिपूत्र असून, ल्हासुर्णे येथे राहतो आणि जनतेची सेवा करतो. माझ्या जुन्या जावळी मतदारसंघातील १८ गावे कोरेगाव मतदारसंघात समाविष्ठ झाली आहेत, त्यामुळे मी पाहुणा कसा, याचे उत्तर द्यावे, असे आव्हान देत मीच बाजी मारणार असल्याचे सांगितले होते.’ (प्रतिनिधी)

काँग्रेसमय खटाव
खटाव तालुक्याने राष्ट्रवादीला यावेळी सहकार्य करण्याची भूमिका घेतल्याचे दिसून आले आहे. या तालुक्यातील काही गावांनी खुलेपणाने काँग्रेसच्या हाताच्या पंजाला साथ दिल्याचे मतांच्या आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे. या तालुक्यातील बुध, डिस्कळ, खटाव, पुसेगाव आणि खटाव गणांतील एकूण ३८ हजार ९६० मतदारांपैकी २१ हजार ११७ मतदारांनी राष्ट्रवादीला साथ दिली आहे. काँग्रेसच्या वाट्याला ९ हजार २९७ मते मिळाली आहेत. ही आकडेवारी धक्कादायक आहे.

तालुक्यात घोडदौड
शशिकांत शिंंदे यांनी कोरेगावातून सलग दुसऱ्यांदा निवडणूक लढवताना तिन्ही तालुक्यांवर चांगले लक्ष केंद्रित केले होते. त्यांनी आपल्या निवडक सहकाऱ्यांना सातारा तालुक्याची जबाबदारी सोपविली होती, ती पूर्ण झाली असून, या तालुक्याने वाढते मताधिक्य देऊन आपले वर्चस्व कायम राखले आहे. सातारा तालुक्यातील खेड, शिवथर, लिंंब, देगाव, निगडी तर्फ सातारा, वर्णे आणि कोडोली गणातील एकूण ६६ हजार ५७१ मतदारांपैकी ३६ हजार १५४ मतदारांनी शिंंदेंना साथ दिली.

नेत्रदीपक कामगिरी नाही
कोरेगावात राष्ट्रवादीकडे स्थानिक स्वराज्य संस्था असताना देखील नेत्रदीपक कामगिरी करता आलेली नाही, हे सत्य नाकारून चालणार नाही. तालुक्यातील वाठार स्टेशन, अंबवडे संमत वाघोली, एकंबे, धामणेर, ल्हासुर्णे, कोरेगाव, सातारारोड, किन्हई, कुमठे आणि चिमणगाव पंचायत समिती गणातील एकूण ७२ हजार २५४ मतदारांपैकी ३७ हजार ३८१ मतदारांनी शशिकांत शिंंदे यांना मतदान केले आहे, तर २३ हजार १४९ मते काँग्रेसच्या अ‍ॅड. विजयराव कणसे यांना मिळाली आहेत.

Web Title: Satara taluka has a big share in the success

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.