शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
4
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
5
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
6
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
7
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
8
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
9
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
10
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
11
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
12
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
13
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
14
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
15
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
16
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
17
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
18
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
19
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
20
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
Daily Top 2Weekly Top 5

सातारा : वीजबिल भरूनही पुरवठा खंडित शेतकरी अडचणीत; पैसे घेऊन ठेकेदाराचा कर्मचारी पसार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2018 13:34 IST

आदर्की (सातारा) : हिंगणगाव परिसरात पावसाने ओढे दिल्याने पिके वाळायला लागली आहेत. धोम-बलकवडी उजव्या कालव्यातून पाणी सोडल्याने कोट्यवधींचे नुकसान टळले असते; पण वीज कंपनीच्या एका कर्मचाºयाने वीज बिलापोटी हजारो रुपये घेऊन पोबारा

ठळक मुद्देऊस, कांदा, मका आदी पिके सुकल्याने शेतकºयांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसानकंपनीचे अधिकारी त्या संबंधित कर्मचाºयाशी आमचा काहीही संबध नसल्याचे सांगत असल्याने व मुख्यमंत्री कृषी योजनेतून एक हप्ता भरून घेतला

आदर्की (सातारा) : हिंगणगाव परिसरात पावसाने ओढे दिल्याने पिके वाळायला लागली आहेत. धोम-बलकवडी उजव्या कालव्यातून पाणी सोडल्याने कोट्यवधींचे नुकसान टळले असते; पण वीज कंपनीच्या एका कर्मचाºयाने वीज बिलापोटी हजारो रुपये घेऊन पोबारा केला. वीज कंपनीचे कर्मचारी कृषिपंपाची वीजपुरवठा खंडित करीत असल्याने शेती अडचणीत येत आहेत. वीजवितरण कंपनीचे अधिकारी त्या संबंधित कर्मचाºयाशी आमचा काहीही संबध नसल्याचे सांगत असल्याने व मुख्यमंत्री कृषी योजनेतून एक हप्ता भरून घेतला आहे. 

फलटण तालुक्याच्या पश्चिम भागातील हिंगणगाव येथे हजारो एकर क्षेत्र बागायती आहे. पण तीन महिन्यांपासून पावसाने ओढ दिल्याने ऊस, कांदा, मका आदी पिके सुकल्याने शेतकºयांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे.हिंगणगाव परिसरात धोम-बलकवडी उजव्या कालव्यातून ओढ्यांना पाणी सोडल्याने पिके वाचणार असल्याने शेतकरी समाधानी झाला. पण वीजवितरण कंपनीच्या कर्मचाºयांनी कृषिपंपाची थकीत वीजबिले असल्याचे सांगून कोणतीही पूर्व सूचना न देता वीजपुरवठा खंडित करीत आहेत.

यापैकी काही शेतकºयांनी वीज कंपनीकडे काम करणाºया कर्मचाºयाकडे वीज बिलापोटी हजारो रुपये दिले आहेत. त्या कर्मचाºयाने भरणा न करता पोबारा केला. याबाबत शेतकºयांनी लोणंदच्या वीजवितरण कार्यालयात विचारणा केली असता ह्यतो कर्मचारी ठेकेदाराने नेमला होता. त्याचा व वीजवितरण कंपनीचा काही संबंध नाही. त्याचे नावे पोलीस स्टेशनला तक्रार द्या,ह्ण असा सल्ला देण्यात आला. 

 

हिंगणगाव येथे काम करणारा कर्मचारी वीजवितरण कंपनीचा नव्हता. वीजवितरण कंपनीचा कोणताही कर्मचारी वीज बिलापोटी रक्कम स्वीकारत नाही. तशा सूचना दिल्या आहेत. वीज ग्राहकांनी, बिल भरणा केंर्द्र, बँक, पोस्ट आॅफिस किंवा आॅनलाईन बिले भरावीत.- सचिन कोरडे,  उपअभियंता,  वीजवितरण कार्यालय, लोणंद

टॅग्स :mahavitaranमहावितरणbillबिलSatara areaसातारा परिसर