शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
4
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
5
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
6
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
7
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
8
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
9
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
10
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
11
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
12
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
13
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
14
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
15
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
16
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
17
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
18
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
19
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
20
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
Daily Top 2Weekly Top 5

सातारा :  बिअरच्या बाटलीने एकास मारहाण, गंभीर जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2018 12:54 IST

उसाच्या गुऱ्हाळावरून एकाने चिडून बिअरच्या बाटलीने मारहाण केली. यात दिशान इकबाल आत्तार (वय २९, रा. माचीपेठ, सातारा) हा गंभीर जखमी झाला.

ठळक मुद्दे  बिअरच्या बाटलीने एकास मारहाण, गंभीर जखमी सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा

सातारा : उसाच्या गुऱ्हाळावरून एकाने चिडून बिअरच्या बाटलीने मारहाण केली. यात दिशान इकबाल आत्तार (वय २९, रा. माचीपेठ, सातारा) हा गंभीर जखमी झाला आहे.याबाबत माहिती अशी की, दिशान आत्तार याचा राजवाडा परिसरात उसाच्या रसाच्या गुऱ्हाळाचा व्यवसाय आहे. काही महिन्यांपूर्वी राजेश माळी (रा. यादोगोपाळ पेठ) याला विरोध दर्शवून गुऱ्हाळ टाकू दिले नाही म्हणून वादावादी झाली होती.दिशान आत्तार मित्रासोबत मंगळवारी रात्री नऊ वाजण्यासाठी सांबरवाडी, ता. सातारा येथे जेवण करण्यासाठी गेला होता. दरम्यान, राजेश माळी त्या ठिकाणी आला. त्याने दिशानला धक्काबुक्की करून शिवीगाळ करण्यास सुरुवात झाली. त्यानंतर संतापाने राजेशने जमिनीवर पडलेली बिअरची मोकळी बाटली उचलली.

ती दगडावर फोडून दिशानवर बाटलीने वार केले. यात दिशानच्या छाती व पाठीवर गंभीर दुखापत झाली. जखमी अवस्थेत दिशानला जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. याप्रकरणी सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीSatara areaसातारा परिसर