शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

सातारा : खासगी सावकारीला कंटाळून उपसरपंचाची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2018 15:02 IST

खासगी सावकारीच्या त्रासाला कंटाळून फलटण तालुक्यातील होळच्या उपसरपंचांनी आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना शुक्रवारी रात्री घडली.|

ठळक मुद्देखासगी सावकारीला कंटाळून उपसरपंचाची आत्महत्याहोळमध्ये शोककळा; गुन्हा नोंद करण्यास नकार दिल्याने ग्रामस्थांचा पोलिसांना घेराव

फलटण/जिंती (सातारा) : खासगी सावकारीच्या त्रासाला कंटाळून फलटण तालुक्यातील होळच्या उपसरपंचांनी आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना शुक्रवारी रात्री घडली. विनोद बबन भोसले (वय ३८) असे आत्महत्या केलेल्या उपसरपंचांचे नाव आहे.याबाबत माहिती अशी की, होळ येथील उपसरपंच विनोद भोसले यांनी शुक्रवार, दि. १७ रोजी रात्री नऊच्या सुमारास जिंती खुंटे रस्त्यावरील एका झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना तेथून जाणाऱ्या लोकांच्या निदर्शनास आली. त्यांनी याची माहिती होळ व साखरवाडी भागातील लोकांना व ग्रामीण पोलीस ठाण्याला दिली.

पोलिसांनी अधिक तपास केला असता भोसले यांच्या खिशात चिठ्ठी सापडली. त्यामध्ये खासगी सावकारी करणाऱ्यांची नावे, रक्कम, त्यांचे मोबाईल नंबर लिहिलेले होते. विशेष म्हणजे या चिठ्ठीच्या चार झेरॉक्स प्रत त्यांनी काढून एक चिट्ठी शर्टमध्ये, एक पँटमध्ये, एक दुचाकीच्या डिकीत तसेच एक मोबाईलच्या कव्हरमध्ये ठेवली होती. मी खासगी सावकारकीला कंटाळून आत्महत्या करत असल्याचे विनोद भोसले यांनी चिठ्ठीत नमूद केले आहे.दरम्यान, चिठ्ठीच्या आधारे संबंधित खासगी सावकारांना अटक करा. त्यांना अटक होत नाही, तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही, अशी भूमिका नातेवाइकांनी घेतली आहे. पोलिसांनी खासगी सावकारीबाबतीत गुन्हा दाखल करण्यास नकार दिल्याने होळसह साखरवाडी परिसरातील लोकांनी पोलीस ठाण्याला घेरले. मात्र, त्यानंतर पोलिसांनी संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली.

टॅग्स :Crimeगुन्हाSatara areaसातारा परिसर