शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणवर रात्रीच हल्ला? नेतन्याहू यांच्या विमानाचं हवेत उड्डाण; ५० ठिकाणं अमेरिकेच्या हिटलिस्टवर
2
इराण-अमेरिका युद्धाची शक्यता? तेहरानच्या इशाऱ्यानंतर कतारमधील अमेरिकन हवाई तळ केले रिकामे
3
ट्रम्प यांच्या टॅरिफवर आज कोणताही निर्णय नाही, अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाची सुनावणी दुसऱ्यांदा पुढे ढकलली
4
Daryl Mitchell च्या शतकासह यंगची 'विल पॉवर'! टीम इंडियावर पलटवार करत न्यूझीलंडनं साधला बरोबरीचा डाव
5
Daryl Mitchell Hundred : डॅरिल मिचेलची कडक सेंच्युरी; किंग कोहलीच 'नंबर वन' स्थान धोक्यात!
6
अमेरिकेने केली इराणची कोंडी, चारही बाजूंनी घेरले; 'या' देशांमध्ये लष्करी तळ...
7
हजारीबागमध्ये भीषण बॉम्ब ब्लास्ट, तिघांचा मृत्यू, एकजण गंभीर जखमी
8
अमेरिकेच्या टॅरिफ धोरणावर आज रात्री फैसला; ट्रम्प यांच्याविरोधात निकाल गेल्यास काय घडू शकतं?
9
शिंदेंच्या उमेदवाराच्या घरावर मतदानाआधी दगडफेक; खिडक्या फोडल्या, खुर्च्या तोडल्या, प्रचंड राडा
10
मैत्री मैत्रीच्या ठिकाणी...! युद्धात इराणला साथ देणार नाही चीन? कारण काय?
11
धक्कादायक ! नागपुरात बाप झाला सैतान,पत्नीकडे ताबा जाऊ नये म्हणून पोटच्या मुलीची हत्या
12
लहानपणीची गोंडस मुलगी आता झालीये सुपरहॉट, रेड बॅकलेस ड्रेसमध्ये सारा अर्जुनचा किलर लूक!
13
"JJD हा लालूंचा खरा पक्ष"; राजद विलीनीकरणावर तेजप्रताप यांची तेजस्वींना थेट ऑफर
14
Petrol कार्सच्या तुलनेत Diesel कार्स जास्त मायलेज का देतात? जाणून घ्या यामागील विज्ञान...
15
बांगलादेशचा आडमुठेपणा! भारतात टी-२० वर्ल्डकप खेळण्यास नकार; आता आयसीसीकडे आहेत ३ पर्याय!
16
IND vs NZ : हर्षित राणानं ऑफ स्टंप उडवत डेवॉन कॉन्वेचा केला करेक्ट कार्यक्रम! गंभीरने अशी दिली दाद
17
मुस्लिमबहुल प्रभागांत रंगणार काँग्रेस-एमआयएम सामना! १३ जागांसाठी काँग्रेसची धडपड, शिंदेसेना चारही जागा राखणार?
18
डोंबिवलीत भाजपा अन् शिंदेसेनेत जोरदार राडा; ५ जणांना अटक, जखमींवर रुग्णालयात उपचार
19
Video - ई-रिक्षातील तरुणाचं अश्लील कृत्य; रणरागिणीने रस्त्यावरच घडवली चांगलीच अद्दल
20
"विना परवाना शस्त्र वाटणार, ज्याला हवं त्याने..."; योगी सरकारच्या मंत्र्याचं धक्कादायक विधान
Daily Top 2Weekly Top 5

साताऱ्याचा डंका चांद्यापासून बांद्यापर्यंत !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2019 23:21 IST

नितीन काळेल । लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : सातारा जिल्ह्यातील यशस्वी ठरलेल्या विविध प्रकल्प आणि योजनांना राज्यातील एक-दोन नव्हे ...

नितीन काळेल ।लोकमत न्यूज नेटवर्कसातारा : सातारा जिल्ह्यातील यशस्वी ठरलेल्या विविध प्रकल्प आणि योजनांना राज्यातील एक-दोन नव्हे तर आतापर्यंत १३ जिल्ह्यांच्या पथकाने भेट देत माहिती घेतलीय. यामध्ये भंडाºयापासून सिंधुदूर्गपर्यंतच्या अनेक जिल्ह्यांचा समावेश आहे. त्यामुळे साताºयाचा हा डंका चांद्यापासून बांद्यापर्यंत पोहोचल्यातच जमा आहे.सातारा जिल्हा परिषदेने गेल्या काही वर्षांत विविध उपक्रम, अभियानाच्या माध्यमातून देशभर नावलौकिक केला आहे. राज्य आणि केंद्र शासनाच्या ही विविध योजना यशस्वी करून डंका निर्माण केलाय. तर अवघ्या आठ महिन्यांपूर्वी साताºयाने स्वच्छतेत देशात प्रथम क्रमांक मिळविलेला. आता तर जिल्हा परिषदेतील सर्व विभाग व परिसरही सौरऊर्जेवर उजळणार आहे. सातारा ही राज्यातील पहिलीच जिल्हा परिषद सौरऊर्जेचा वापर करणारी ठरू शकते. अशा या जिल्ह्यातील विविध यशस्वी प्रकल्प पाहण्यासाठी राज्यातील विविध जिल्ह्यांची पथके भेट देत आहेत.कोल्हापूर, सांगली, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, अमरावती, वर्धा, जळगाव, नाशिक, चंद्रपूर, धुळे, भंडारा व वाशिम या जिल्ह्यातील पथकांनी साताºयाला भेट दिली. तर काही दिवसांपूर्वीच जालना जिल्ह्यातीलही पथक जिल्ह्याच्या भेटीवर आले होते. या पथकांनी सातारा तालुक्यातील नागठाणे गावातील आदर्श घनकचरा व्यवस्थानाची पाहणी केली. तसेच सुका व ओल्या कचºयाचे वर्गीकरण करणे, त्यापासून खत तयार कसे करण्यात येते, याची सविस्तर माहिती घेतली. त्याचबरोबर कºहाड तालुक्यातील बनवडीलाही भेट देत तेथील घनकचरा व्यवस्थानाबद्दल अधिक माहिती जाणून घेतली. पाटण तालुक्यातील आदर्श गाव मान्याचीवाडीलाही भेट देण्यात आली. अनेक योजना आणि उपक्रमांत या गावाने आपली ओळख निर्माण केलीय. या गावालाही पथकाने भेट देत माहिती घेतली. साताºयातील अशा गावांचा आदर्श घेऊनच राज्यातून भेटीसाठी आलेल्या जिल्ह्यांनी काम सुरू केले आहे. साताºयातील आदर्श गावातील व्यवस्थापनाचे धडे इतर जिल्हे व गावे गिरवणार आहेत. हे जिल्ह्यासाठी निश्चितच गौरवास्पद आहे.नागठाणेआदर्श घनकचरा व्यवस्थापनओला व सुक्या कचºयासाठी वाहन व्यवस्थाओल्या कचºयापासून गांडूळ खत निर्मितीसुक्या कचºयातील प्लास्टिक गोळा करून विक्रीदीड वर्षात गांडूळ खताची साडेतीन लाखांची विक्रीगाव कचरामुक्त व ग्रामस्थांना स्वच्छतेची सवयगावातील दुर्गंधी संपण्यास मदतशेतकऱ्यांकडून सेंद्रीय शेतीस चालनाबनवडीगावात २४ बाय ७ नळपाणीपुरवठा योजनामीटरद्वारे ग्रामस्थांना पाणीपुरवठाआदर्शवत सांडपाणी प्रकल्प कार्यान्वितगांडूळ खताची ३५ टन निर्मितीसांडपाणी प्रकल्पावर दीड एकरवर केळीची बागओला व सुका कचरा गोळा करण्यासाठी स्वतंत्र वाहनेआठ हजार जणांची भेटगेल्या काही वर्षांत १३ जिल्हे आणि ५४० गावे, संस्था आणि शाळांनी सातारा जिल्ह्यातील विविध गावांना भेट देत आदर्श कामांची माहिती घेतलीय. या अंतर्गत भेट देणाºयांची संख्या जवळपास ८ हजार इतकी आहे. भेट देणाºयांनी आपले गाव आणि जिल्ह्यात साताºयाप्रमाणे काम सुरू केले आहे.