शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

सातारा, सोलापूरला निधी कमी पडू देणार नाही; मुख्यमंत्र्यांनी खासदार रणजितसिंहांना दिली ग्वाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2023 14:16 IST

नसीर शिकलगार फलटण : फलटण तालुक्यासह सातारा व सोलापूर जिल्ह्याच्या विकास कामांना जी खीळ बसली होती, ती भरून काढून ...

नसीर शिकलगारफलटण : फलटण तालुक्यासह सातारा व सोलापूर जिल्ह्याच्या विकास कामांना जी खीळ बसली होती, ती भरून काढून पुन्हा नव्या जोमाने विकासकामे सुरु करण्यासाठी आपले सरकार कटिबद्ध आहे. आगामी काळात याठिकाणच्या कोणत्याही प्रकल्पाला निधी कमी पडू देणार नाही अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना दिली. रखडलेल्या कामास मंजुरी दिल्याबद्दल खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेवून आभार मानले. यावेळी मुख्यमंत्र्यांनीही ग्वाही दिली.सातारा जिल्ह्यातील खंडाळा, फलटण व सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस व सांगोला या तालुक्यातील कायमस्वरूपी दुष्काळी भाग ही ओळख आता पुसण्यासाठी निरा - देवधरच्या प्रकल्पाला मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी देण्यात आली आहे. यामुळे हा रखडलेला प्रकल्प आता मार्गी लागणार आहे. यासोबतच झिरपवाडी येथील शासकीय रुग्णालयाला निधी दिल्याबद्दल व फलटण येथे अतिरिक्त सत्र न्यायालयाच्या रखडलेल्या कामास मंजुरी दिल्याबद्दल खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेवून आभार व्यक्त केले. यावेळी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, महाविकास आघाडी सरकारने लोकहितार्थ असणारे बरेचसे प्रकल्प रखडवले होते. परंतु आताचे सरकार हे सर्वसामान्य जनतेचे सरकार आहे. यामध्ये सर्वसामान्य नागरिकांच्या हिताचे जे प्रकल्प असतील ते कोणतेही प्रकल्प रखडले जाणार नाहीत. आपले सरकार अतिशय खंबीर असून आगामी काळामध्ये सुद्धा नागरिकांच्या दृष्टीने महत्वाचे असलेले सर्व प्रकल्प मार्गी लावण्यात येतील सांगितले. 

टॅग्स :Satara areaसातारा परिसरRanjitshinh Naik-Nimbalkarरणजितसिंह नाईक-निंबाळकरEknath Shindeएकनाथ शिंदे