शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

सातारा : व्यसनमुक्तीसाठी सोशल मीडियावर चित्रमय जागर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2018 14:01 IST

लोकांना व्यसनांपासून दूर करण्यासाठी खंडाळ्यातील युवकाने चित्रांद्वारे सोशल मीडियावर प्रबोधन सुरू केले असून, या उपक्रमाचे सर्वत्र कौतुकही होत आहे.

ठळक मुद्देव्यसनमुक्तीसाठी सोशल मीडियावर चित्रमय जागरखंडाळ्यातील युवकाचे प्रबोधन अनोख्या उपक्रमाचे नागरिकांमधून कौतुक

खंडाळा : का जडला हा रोग मजला, का जडली ही विदीर्ण व्याधी, दिसले माझे मरणच मजला, जीवन जगण्या आधी, आयुष्यातील विविध व्याधींचे मूळ हे व्यसन आहे. हीच व्याधी आपणास मरणाच्या दारात खेचून नेत असते.

वास्तविक याची जाणीव सर्वांनाच असते. मात्र, व्यसनापासून दूर व्हायला मन सहजासहजी धजावत नाही; पण लोकांना व्यसनांपासून दूर करण्यासाठी खंडाळ्यातील युवकाने चित्रांद्वारे सोशल मीडियावर प्रबोधन सुरू केले असून, या उपक्रमाचे सर्वत्र कौतुकही होत आहे.माणसांनी व्यसनमुक्त व्हावे, यासाठी अनेक सामाजिक संघटना काम करीत असतात. परंतु सर्वांचेच प्रयत्न फळाला येतात असे नाही. खंडाळ्यातील प्राणीमित्र रवींद्र पवार याने संगणकावरील चित्रमय कौशल्यातून व्यसनमुक्तीचे पाठ लोकांपुढे मांडले आहेत.

यामध्ये सिगारेट ओढणे, धूम्रपान करणे यामुळे शरीरावर होणारे विपरत परिणाम, दारू पिऊन घरावर येणारे संकट तसेच गाडी चालवताना मोबाईलचा वापर करणे ते अलीकडच्या काळातसेल्फी काढताना डोंगर कड्याावर उभे राहिल्याने घडणारे अनर्थ अशा विविध विषयांवर प्रकाश टाकला आहे.विशेष म्हणजे व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुकसारख्या सोशल मीडियाच्या माध्यमातून ते लाखो माणसांपर्यंत पोहोचले जात आहे. या चित्रांमधून तरुणांमध्ये प्रबोधन घडत आहे. तरुण वर्ग व्यसनांपासून दूर राहण्यासाठी याचा मोठा प्रभाव पडत आहे.

वास्तविक रवींद्र पवार याने प्राणीमित्र म्हणून वाईल्ड लाईफ संघटनेच्या माध्यमातून अनेक प्राणी-पक्ष्यांना जीवदान दिले आहे. मात्र, व्यसनाच्या आहारी चाललेल्या युवा पिढीला यापासून परावृत्त करण्यासाठी काहीतरी करायले हवे, असा विचार त्याच्या मनात आला आणि त्याने तोप्रत्यक्षात साकारलाही. चित्रांच्या माध्यमातून त्याने युवकांमध्ये व्यसनमुक्तीबाबत प्रबोधन सुरू केले असून, या अनोख्या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे. 

जग आधुनिकीकरणाकडे वाटचाल करीत असले तरी तरुण वर्ग व्यसनांकडे झुकत आहे. त्यांना व्यसनांपासून प्रवृत्त करणे गरजेचे आहे. या जाणिवेतून ही संकल्पना सूचली. अशा विविध चित्रांचे प्रदर्शन आयोजित करण्याचा विचार आहे. यातून लोकांमध्ये चांगला संदेश पोहोचेल.- रवींद्र पवार, प्राणीमित्र खंडाळा

टॅग्स :Social Mediaसोशल मीडियाSatara areaसातारा परिसर