शहरं
Join us  
Trending Stories
1
देशाला मजबूत पंतप्रधानांची गरज, नरेंद्र मोदी तर भाजपाचे प्रचारमंत्री; उद्धव ठाकरेंचं टीकास्त्र
2
व्हाट्सअ‍ॅपच घोटाळेबाजांपासून सावध करणार, युजर्ससाठी दोन सेफ्टी टूल लाँच...; कशी वापरायची...
3
भारत अन् चीनचे जमायला लागले, तिकडे पाकिस्तान अस्वस्थ झाला, नवीन रडारड केली सुरू
4
"पुढच्या जन्मात मी तुलाच माझी पत्नी बनवेन"; काकीच्या प्रेमात वेडा झाला २६ वर्षीय तरुण अन्...
5
Mamata Banerjee : "मी जिवंत सिंहीण, जखमी करण्याचा प्रयत्न करू नका, अन्यथा...", ममता बॅनर्जींचं भाजपाला चॅलेंज
6
आता भारतातूनच खरेदी करा Apple, Microsoft चे शेअर्स! परदेशी गुंतवणुकीचा सोपा मार्ग, काय आहेत नियम व अटी?
7
“उपराष्ट्रपतींना तडकाफडकी राजीनामा का द्यावा लागला, आता आहेत तरी कुठे?” उद्धव ठाकरेंचा सवाल
8
तुम्ही जे पाहता ते 'स्क्रिप्टेड'! खुद्द क्रिकेटच्या देवानं शेअर केलं पंत संदर्भातील 'सीक्रेट'
9
प्रियकराच्या मदतीनं पतीला तडफडून मारले, आईचा कट लेकीनं केला उघड; पप्पाला कसं संपवलं, पोलिसांना सांगितले
10
"मोठी किंमत चुकवावी लागेल माहितीये, पण..."; पंतप्रधान मोदींचे डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ बॉम्बवर थेट उत्तर
11
विवेक सांगळेने लालबागमध्ये घेतलं नवीन घर, शेजारीच वडिलांची मिल; भावुक होत म्हणाला...
12
पतीला यमसदनी पाठवणाऱ्या सोनम रघुवंशीला बॉयफ्रेंडसोबत तुरुंगातून पडायचंय बाहेर; पण कोर्टानं सुनावला वेगळाच निर्णय!
13
उधमपूरमध्ये CRPF चे वाहन खोल दरीत कोसळले; दोन जवानांचा दुर्दैवी मृत्यू, १२ जखमी
14
Video: भाषिक वादावरून उद्धव ठाकरे दिल्लीत कडाडले; राज ठाकरेंसोबतच्या युतीवरही स्पष्टच बोलले
15
ट्रम्प टॅरिफमुळे 'या' क्षेत्राला होणार ₹२४,००० कोटींचं नुकसान; या कंपन्यांचे शेअर्स क्रॅश, तुमच्याकडे आहेत का?
16
'सुहागरात' झाली, नवऱ्याला खोलीत कोंडून बायको बाल्कनीत आली अन्...; स्टोरी ऐकून पोलिसही चक्रावले
17
चाळीशी ओलांडल्यावर 'या' गोष्टी सोडा, शंभर वर्षं जगाल; सांगताहेत तरुण सागर महाराज!
18
नवरा गंगास्नानासाठी गेला, बायकोने १५ लाखांच्या दागिन्यांवर डल्ला मारून बॉयफ्रेंडसह पळ काढला
19
ठरलेलं लग्न मोडलेला तरुण 'सैयारा' चित्रपट बघायला गेला, घरी परतला अन्...; संपूर्ण गावाला बसला मोठा धक्का!
20
पोस्ट ऑफिसच्या 'या' योजनेत वर्षाला फक्त १.५ लाख गुंतवून मिळवा ७० लाख रुपये, संपूर्ण रक्कम टॅक्स फ्री

सातारा : शिवेंद्रसिंहराजे गटाला विकासकामातून उत्तर देऊ  : उदयनराजे भोसले यांचा खणखणीत इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2018 13:37 IST

सातारा विकास आघाडी जाहीरनाम्यानुसारचं विकासकामे करीत आहे. नुसती आश्वासने देऊन आम्ही जनतेची फसवणूक करत नाही. चुल आमची, तवा आमचा अन् भाकरी खाणारा भलता असं म्हणणाऱ्यांना आम्ही विकासाकामांतूनच उत्तर देऊ, असा टोला खासदार उदयनराजे भोसले यांनी आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या गटावर नाव न घेता लगावला.

ठळक मुद्देसातारा : शिवेंद्रसिंहराजे गटाला विकासकामातून उत्तर देऊ  उदयनराजे भोसले यांचा खणखणीत इशारासाताऱ्यात भुयारी गटर योजेनचा शुभारंभ

सातारा : सातारा विकास आघाडी जाहीरनाम्यानुसारचं विकासकामे करीत आहे. नुसती आश्वासने देऊन आम्ही जनतेची फसवणूक करत नाही. चुल आमची, तवा आमचा अन् भाकरी खाणारा भलता असं म्हणणाऱ्यांना आम्ही विकासाकामांतूनच उत्तर देऊ, असा टोला खासदार उदयनराजे भोसले यांनी आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या गटावर नाव न घेता लगावला.सातारा पालिकेच्या भुयारी गटर योजनेसह कोटेश्वर पुल आणि सुमित्राराजे उद्यान पुलाच्या रुंदीकरणाच्या कामांचा शुभारंभ उदयनराजे भोसले यांच्या हस्ते करण्यात आला. याप्रसंगी ते बोलत होते.

कार्यक्रमास नगराध्यक्षा माधवी कदम, मुख्याधिकारी शंकर गोरे, पाणीपुरवठा सभापती श्रीकांत आंबेकर, बांधकाम सभापती मनोज शेंडे, आरोग्य सभापती यशोधन नारकर, नगरसेवक राजू भोसले, अल्लाउद्दीन शेख आदी उपस्थित होते.खा. उदयनराजे म्हणाले, ह्यशहराची वाढती लोकसंख्या अन् भविष्यात होणारी हद्दवाढ याचा विचार करून पुढील चाळीस ते पन्नास वर्षांपर्यंत सातारकरांना मुबलक पाणी उपलब्ध व्हावे, यासाठी कास धरणाची उंची वाढविण्याचा महत्वाकांक्षी प्रकल्प हाती घेतला आहे.

गटारातून वाहनारे दुषित पाणी नद्यांमध्ये मिसळून जलप्रदूषण होते. हे टाळण्यासाठी भुयारी गटार योजना अंमलात आणून हे पाणी शुद्धीकरण करण्यात येणार आहे. आज पहिला टप्प्यातील कामाचा शुभारंभ झाला, याचा मनस्वी आनंद होत आहे.या कामामुळे नागरिकांची थोडीफार गैरसोय होणार आहे. त्यामुळे नागरिकांनी विरोधकांच्या टीकेकडे लक्ष न देता विकासकामांना साथ द्यावी. दरम्यान, भाकरी खाणारा भलता असं म्हणणाऱ्यांना आम्ही केवळ विकासाकामांतूनच उत्तर देऊ, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.

टॅग्स :Udayanraje Bhosaleउदयनराजे भोसलेSatara areaसातारा परिसर