शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थ पवार ते ७० हजार कोटी; दोन मोठ्या आरोपांवर अजितदादांचे उत्तर; म्हणाले, "सकाळी कामाला लागतो ते..."
2
"कुराणची शपथ घेऊन सांगतो, भाजप...!" मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांचा मोठा दावा, राजकारण तापलं
3
पार्थच्या व्यवहाराचे ४२ कोटी कोण भरणार? मुंढव्यातील वादग्रस्त व्यवहार आज रद्द होणार?
4
परराज्यातील मुलांना एमबीबीएसला प्रवेश घेण्याची मुभा द्या, पालघरच्या कॉलेजने घेतली उच्च न्यायालयात धाव
5
आजचे राशीभविष्य,१० नोव्हेंबर २०२५: दुपार नंतर समस्या कमी होऊ लागतील; सामाजिक प्रतिष्ठेत वाढ होईल
6
तीन शहरांत रेकी, विषही तयार; अतिरेक्यांचा मोठा कट उधळला, गुजरात एटीएसने पकडले ३ अतिरेकी
7
एक दिवस CM बनवलं तर काय कराल? अमृता फडणवीस म्हणाल्या- "मी देवेंद्रजींना..."
8
१२ वर्षांनी शतांक गजकेसरी योग: ८ राशींना लॉटरी, इच्छापूर्ती; नवीन नोकरी, अकल्पनीय पैसा-लाभ!
9
विशेष लेख: 'हमारी छोरिया छोरो से कम हैं के?'
10
महाराष्ट्र्रात १३ हजार बोगस कंपन्यांना टाळे; जीएसटीविरोधीत मोहीम
11
मराठी अभिनेता दुसऱ्यांदा होणार बाबा, पार पडलं पत्नीचं बेबी शॉवर; अरुण गवळीच्या मुलीसोबत थाटलाय संसार
12
मुस्लिम आणि ख्रिश्चन RSS चे सदस्य होऊ शकतात का? मोहन भागवत म्हणाले, "शाखेत येऊ शकतात, पण..."
13
‘’राज्याच्या विकासासाठी महायुती एकदिलाने लढणार, जागा वाटपाबाबत कोणतेच मतभेद नाहीत”, एकनाथ शिंदे यांचं मोठं विधान 
14
तक्रारदारासोबत गैरवर्तन, २ पोलिस अधिकारी निलंबित
15
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
16
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
17
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
18
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
19
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
20
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज

सातारा : एका दिवसात ४० लाखांची वसुली, लोकअदालतीचा फायदा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2018 14:02 IST

सातारा जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागाने थकीत घरपट्टी व पाणीपट्टीची प्रकरणे निकाली काढण्यासाठी आयोजित केलेल्या लोकअदालतीचा चांगलाच परिणाम झाला आहे. ८ सप्टेंबर रोजी आयोजित केलेल्या या मोहिमेत तब्बल ४० लाख १३ हजार ९०३ रुपयांची वसुली झाली.

ठळक मुद्देएका दिवसात ४० लाखांची वसुली, लोकअदालतीचा फायदा सातारा जिल्ह्यातील ग्रामपंचायतींची घरपट्टी, पाणीपट्टी वसुली मोहीम

सागर गुजर

सातारा : जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागाने थकीत घरपट्टी व पाणीपट्टीची प्रकरणे निकाली काढण्यासाठी आयोजित केलेल्या लोकअदालतीचा चांगलाच परिणाम झाला आहे. ८ सप्टेंबर रोजी आयोजित केलेल्या या मोहिमेत तब्बल ४० लाख १३ हजार ९०३ रुपयांची वसुली झाली.घरपट्टी व पाणीपट्टीची थकबाकी भरण्याबाबत जिल्ह्यातील ६२५ ग्रामपंचायतींच्या ५३ हजार ९८८ खातेदारांना नोटीस बजावली होती. नोटीस बजावल्यानंतर ९ हजार ६३७ खातेदारांनी स्वत:हून पुढाकार घेत थकीत बिले भरली. नोटीस काळात २५ कोटी ९० लाखांची वसुली झाली.जिल्ह्यातील ५८८ ग्रामपंचायतीच्या थकीत कर वसुलीसाठी जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागाने लोकअदालतीचे आयोजन केले होते. या लोकअदालतीबाबत जिल्ह्यातील ५३ हजार ९८८ खातेदारांना नोटीस बजावण्यात आली होती. ८ सप्टेंबर रोजी झालेल्या लोकअदालतीत ३२६ ग्रामपंचायतींच्या १ हजार ७२७ खातेदारांनी सहभाग घेतला. या लोकअदालतीमध्ये सातारा तालुक्यातील ६२ ग्रामपंयतीच्या ४२१ खातेदारांकडून १० लाख ३० हजार २७७ रुपयांची वसुली झाली.

कोरेगाव तालुक्यातील ११ ग्रामपंचायतीच्या ३९० खातेदारांकडून ७ लाख २३ हजार ९१० रुपये, खटावातील १६ ग्रामपंचायतीच्या ८३ खातेदारांकडून २ लाख ९१ हजार ५८४ रुपये, माणमधील १२ ग्रामपंचायतीच्या ६२ खातेदारांकडून ४७ हजार ५३४ रुपये, फलटणमधील ४९ ग्रामपंचायतीच्या १५९ खातेदारांकडून ३ लाख ११ हजार ७०० रुपये, खंडाळ्यातील १८ ग्रामपंचायतीच्या ५८ खातेदारांकडून १ लाख ७४ हजार ४२९ रुपये, वाईमधील ४६ ग्रामपंचायतीच्या ८२ खातेदारांकडून ३ लाख ४१ हजार ९५० रुपये, जावळीतील १४ ग्रामपंचायतींच्या ४२ खातेदारांकडून ७६ हजार ९६५ रुपये, महाबळेश्वरमधील ७ ग्रामपंचायतींच्या २६ खातेदारांकडून ५४ हजार ८६६ रुपये, कऱ्हाडातील ६५ ग्रामपंचायतींमधील २२० खातेदारांकडून ५ लाख ७६ हजार ९५७ रुपये, पाटण तालुक्यातील २६ ग्रामपंचायतीच्या १८४ खातेदारांकडून ३ लाख ८३ हजार ७३३ रुपयांची वसुली झाली.आठ दिवसांत तीन कोटींची वसुलीजिल्ह्यातील ५८८ ग्रामपंचायतीच्या ११ हजार ३६४ खातेदारांना वसुलीबाबत नोटिसा पाठविण्यात आल्या होत्या. नोटीस बजावल्यानंतर १ सप्टेंबर ते ८ सप्टेंबर या कालावधीत २ कोटी ९० लाख १३ हजार ९९३ रुपयांची वसुली झाली.सातारा महाराष्ट्रात दुसरासातारा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाने आयोजित केलेल्या लोकअदालतीच्या माध्यमातून जिल्ह्याचा महाराष्ट्रात द्वितीय क्रमांक आला आहे. थकीत पाणीपट्टी व स्ट्रिटलाईट वीजबिलाच्या वसुलीमध्ये सातारा जिल्ह्याचा महाराष्ट्रात दुसरा क्रमांक आला आहे. पुणे जिल्ह्याचा प्रथम क्रमांक आला आहे. महाराष्ट्र स्टेट लिगल सर्व्हिसेस आॅथॅरिटी, मुंबई यांनी याची घोषणा केली आहे.

लोकअदालतीमध्ये थकीत कर वसुलीचे दावे निकाली निघत आहेत, ही अत्यंत जमेची बाजू आहे. यामध्ये संबंधित ग्रामपंचायती व त्यांचे खातेदार यांच्यात सामोपचाराने समेट घडवला जातो. थकीत कर वसुलीचा फायदा ग्रामपंचायतहद्दीतील विकासकामांसाठीच होत असतो. लोकांनी थकबाकीच ठेवली नाही तर लोकअदालतीपर्यंत जाण्याचीही वेळ येणार नाही.- डॉ. कैलास शिंदे, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद

ग्रामपंचायतींच्या थकीत बिलाच्या वसुलीसाठी लोकांनी सहकार्य करणे आवश्यकआहे. लोकअदालतीत जाण्याची वेळ येऊ नये, याची काळजी प्रत्येकाने घेतलीपाहिजे. ग्रामपंचायतीच्या माध्यमातून होणाऱ्या विकासकामांसाठीच कर वसुलीवेळेत भरणे आवश्यक आहे.- अविनाश फडतरे,उपमुख्य कार्यकारी अधिकारी ग्रामपंचायत 

टॅग्स :zpजिल्हा परिषदSatara areaसातारा परिसर